AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजी मंडईत महागाईचा तडका, फरसबी, गवार शंभरी पार, पाहा आजचे भाव

महाराष्ट्रातील अनियमित पावसामुळे भाजीपाल्याचे दर प्रचंड वाढले आहेत. फरसबी, गवार, मटार आदी भाज्यांच्या किमती शंभरी पार गेल्या आहेत. यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. गोकुळ दुधाचे दरही वाढले आहेत आणि मुंबईत बेस्टच्या बस तिकिटांचे दर दुप्पट झाले आहेत.

भाजी मंडईत महागाईचा तडका, फरसबी, गवार शंभरी पार, पाहा आजचे भाव
vegetables
| Updated on: May 13, 2025 | 3:10 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून महागाई सातत्याने वाढत आहे. त्यातच आता सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आता थेट ग्राहकांना बसला आहे. सध्या भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. फरसबी, शेवग्याच्या शेंगा, गवार आणि मटार यांसारख्या भाज्यांची किंमत शंभरी पार गेली आहे. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात अवकाळी पावसामुळे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक भाज्या या शंभरी पार गेल्या आहेत. यामुळे गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. सध्या लाल भोपळ्याव्यतिरिक्त इतर अनेक भाज्यांचे दर ५० रुपयांपेक्षा जास्त आहेत. यामुळे दरवाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे भाज्यांच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. ज्यामुळे दरात वाढ झाली आहे.

भाज्यांचे वाढलेले दर (किलोमध्ये)

फरसबी: १६० रुपये गवार: १६० रुपये तोडली: १६० रुपये पापडी: १२० रुपये मटार: १६० रुपये शिमला मिरची: १६० रुपये भेंडी: ८० रुपये बीट: ६० रुपये लिंबू: २० रुपयाला ३ नग

गोकुळ दुधाच्या दरात वाढ

तर दुसरीकडे गोकुळ दुधाच्या दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यानुसार, पुणे आणि मुंबईत म्हशीचे दूध प्रतिलिटर ७४ रुपये, तर उर्वरित महाराष्ट्रात ६८ रुपये प्रतिलिटर दराने विक्री केले जात आहे. तसेच गायीच्या दुधातही २ रुपयांची वाढ झाली आहे. मुंबई-पुण्यात ५८ रुपये आणि उर्वरित राज्यात ५० रुपये प्रतिलिटर दर पाहायला मिळत आहेत.

बसचे तिकीट दर दुप्पट

एवढंच नाही तर सर्वसामान्यांना आणखी एक मोठा आर्थिक झटका बसला आहे. बेस्ट प्रशासनाने बसचे तिकीट दर दुप्पट केले आहेत. यामुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च महागला आहे. दरम्यान वाढलेली महागाई आणि त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशावर खर्चाचा ताण पडत आहेत. भाज्यांचे वाढलेले दर आणि दुधाच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. तर बेस्टच्या दरवाढीमुळे प्रवासाचा खर्च वाढणार आहे.

Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट