तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकरांच्या कुटुंबाला आणखी दोन धक्के, मुलीपाठोपाठ नातवाचेही निधन

कांताबाई यांचे देहावसान होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई कोरोनाने गेल्या होत्या. आता कांताबाईंच्या निधनाला अवघा आठवडाही होत नाही, तोच नातवालाही काळाने हिरावून घेतले. (Kantabai Satarkar Daughter Grandson Dies )

तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकरांच्या कुटुंबाला आणखी दोन धक्के, मुलीपाठोपाठ नातवाचेही निधन
अभिजीत, अनिताताई आणि कांताबाई खेडकर
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 9:30 AM

शिर्डी : ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर (Kantabai Satarkar) यांच्या निधनासोबतच कुटुंबियांना आणखी दोन धक्के बसले आहेत. कांताबाई सातारकर यांच्या कन्या आणि नातवाचेही निधन झाले. मुलगी अनिता उर्फ बेबीताई आणि नातू अभिजित उर्फ बबलू यांचं कोरोना संसर्गावरील उपचारा दरम्यान निधन झाले. 15 दिवसांच्या कालावधीत कुटुंबातील तिघा जणांच्या मृत्यूने खेडकर कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. (Veteran Tamasha Artist Kantabai Satarkar Daughter Grandson Dies of Corona)

आधी लेक, मग नातू

आपल्या अदाकारीने तमाशा जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ वगसम्राज्ञी, मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं 25 मे रोजी कोरोनाने निधन झालं. त्या 82 वर्षाच्या होत्या. प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या त्या मातोश्री. कांताबाई यांचे देहावसान होण्यापूर्वी पाच दिवस अगोदर त्यांच्या सर्वात ज्येष्ठ कन्या अनिता उर्फ बेबीताई कोरोनाने गेल्या होत्या. कांताबाई सातारकर आणि तुकाराम खेडकर या दोन महान कलाकारांची ज्येष्ठ कन्या म्हणजे अनिताताई. आता कांताबाईंच्या निधनाला अवघा आठवडाही होत नाही, तोच नातवालाही काळाने हिरावून घेतले.

काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. अनिता यांचे संगमनेरमध्ये तर अभिजित याचे नाशिकमध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. दुःखाची एक लाट ओसरते न ओसरते तोच दुःखाची दुसरी भलीमोठी लाट येऊन गिळंकृत करुन गेल्याची खेडकर कुटुंबीयांची भावना आहे.

कांताबाई सातारकर यांचा परिचय

1939 मध्ये कांताबाईंचा जन्म झाला होता. गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगडखाणीत काम करणाऱ्या साहेबराव व चंद्राबाई या दांपत्याच्यापोटी कांताबाईंचा जन्म झाला. त्यांच्या कुटुंबात तमाशा नव्हता. तसेच तमाशाशी कुणाचा संबंधही नव्हता. त्यांचे वडील गुजरातमधून मूळगावी साताऱ्याला आले. तेव्हा कांताबाई बालपणी मैत्रीणींसोबत नृत्य करायच्या. साताऱ्यातील विविध मेळ्यातील नृत्याची त्या नक्कल करायच्या. त्यातूनच त्यांचा नृत्य आणि तमाशाकडे कल वाढला. पुढे साताऱ्यातील सर्जेराव अहिरवाडीकर यांच्या तमाशात त्यांनी काम सुरू केलं. बघता बघता कांताबाई सातारकर हे नाव गाजू लागलं.

खेडकरांशी आयुष्याची जोडी जमली

कांताबाईंनी पुण्या-मुंबईतही तमाशाचे खेळ केले. त्यानंतर त्यांनी पुढे हनुमान थिटएटरमधील तुकाराम खेडकरांच्या तमाशात काम सुरू केलं. खेडकराच्या तमाशाचा बाज आवडल्याने त्यांनी खेडकरांच्या तमाशात काम करण्याचा निर्णय घेतला. कांताबाई आणि खेडकर या जोडीने रायगडाची राणी अर्थात पन्हाळगडचा नजरकैदी, पाच तोफांची सलामी, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, जय विजय, गवळ्याची रंभा आदी धार्मिक, सामाजिक वगनाट्यात काम केलं. तमाशात गाजलेली ही जोडी पुढे आयुष्यताही एक झाली. त्यांनी तुकाराम खेडकर यांच्याशी विवाह केला. पुढे त्यांना अनिता, अलका, रघुवीर व मंदाराणी अशी चार अपत्ये झाली. मुंबईतला गिरणी कामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थियेटरला जायचा.

पतीच्या निधनानंतर एकाकी पडल्या

1964 मध्ये त्यांच्यावर मोठा आघात झाला. येवला तालुक्यातील एका गावात तमाशा सुरू असताना अचानक तुकाराम खेडकर यांची तब्येत बिघडली. त्यामुळे उपचारासाठी पुण्याला नेत असताना खेडकरांचे निधन झाले. पती गेल्यानंतर त्या एकट्या पडल्या. त्यांचं नशीब फिरलं. एवढेच नव्हे तर त्यांना पतीच्याच तमाशातून बाहेर पडावे लागले होते. (Kantabai Satarkar Daughter Grandson Dies )

कांताबाईंनी मुलांसह तमाशा फड सोडला. तेव्हा बेबीताई अवघ्या 8-9 वर्षाच्या होत्या. कांताबाईसाठी अनिता हेच भविष्य होते. त्यांनी 4-5 वर्ष कसे बसे इतर तमाशात काम केले. 1969 पर्यंत अनिताताई नृत्यात, अभिनयात, गाण्यात पारंगत झाल्या होत्या.

जीवन गौरवने सन्मानित

दोन वर्षापूर्वी त्यांनी वयाची 80 वर्षे पूर्ण केली होती. त्याबद्दल आणि तब्बल 70 वर्षे तमाशा कला क्षेत्रात मोठं योगदान दिल्याबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. संगमनेरमधील मालपाणी लॉन्सवर एका भव्य कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. या कार्यक्रमाला अनेक बडे नेते उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

मर्दानी पोवाडा गाणारी तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचं निधन

(Veteran Tamasha Artist Kantabai Satarkar Daughter Grandson Dies of Corona)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.