5

Helicopter crash: राऊतांची शंका अनेकांच्या मनात! अपघाताची कारणं देशाला कळावी, मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या अपघाताविषयी शंका उपस्थित केली. हा अपघात नसून घातपात असू शकतो. याची सविस्तर चौकशी व्हावी.

Helicopter crash: राऊतांची शंका अनेकांच्या मनात! अपघाताची कारणं देशाला कळावी, मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार
Follow us
| Updated on: Dec 09, 2021 | 1:10 PM

नागपूरः देशाच्या लष्कराच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या व्यक्तीचा एवढा भीषण अपघातात (Helicopter crash)  मृत्यू ही दुःखाची बाब आहे. या अपघाताबाबत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलेली शंका अनेकांच्या मनात आहे. राऊतांच्या मनातील शंकेचं निरसन व्हावं, हा अपघात नेमका कसा घडला, याची माहिती केंद्र सरकारनं जनतेला द्यावी, अशी मागणी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केली.

नेमका अपघात कसा घडला, याची माहिती द्यावी- वडेट्टीवार

मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या अपघाताविषयी शंका उपस्थित केली. हा अपघात नसून घातपात असू शकतो. याची सविस्तर चौकशी व्हावी. संजय राऊत यांच्या मनातील शंका अनेक जणांच्या मनात आहे. त्यामुळे हा नेमका अपघात कसा घडला याची माहिती देशाला कळावी, सत्ताधाऱ्यांची याची माहिती द्यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.

ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण घरी परतला

जगभरावर आलेल्या ओमिक्रॉन या विषाणूच्या संकटावर प्रतिक्रिया देताना विजय वडेट्टीवर म्हणाले, कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही येणार माहिती नाही, मात्र आपण सतर्क रहायला हवं. यात हवामान खात्यासारखे अंदाज लावता येत नाहीत. पण आपण तयारीत असलेलं बरं. ओमिक्रॉनच्या बाबतीत घाबरून जाण्याचं कारण नाही. आजच राज्यातला पहिला ओमिक्रॉनचा रुग्ण बरा झालाय. तो घरीही परतला आहे. याबाबतीत उगाच भीतीचं वातावरण तयार केलं गेलं आहे. आपण काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही निर्बंध लावण्याची तयारी नाही. देश पातळीवरही कोरोनाचा दर कमी होत आलाय. देशात अॅक्टिव्ह रुग्ण कमी आहेत.

OBC आरक्षणाबाबत भाजपचा ढोंगीपणा- वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया देताना वडेट्टीवार म्हणाले, ओबीसींचे आरक्षण गमावण्यासाठी भाजप जबाबदार आहे. जोपर्यंत केंद्र सराकरा याबाबत अमेंडमेंट आणत नाही. तोपर्यंत हे शक्य नाही. भाजपने मात्र या प्रकरणी नेहमीच टोलवाटोलवी केली आहे. घटनादुरुस्ती करुन केंद्र सरकारने ओबीसींचं 27 टक्के आरक्षण क्लिअर करावं आणि विषय संपवावा. भाजप ढोंगीपणा करुन लोकांमध्ये संभ्रम तयार करु नये.

इतर बातम्या-

Video :अपघातातून बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती कशी आहे? राजनाथ सिंगांची सभागृहाला माहिती

Helicopter Crash | कुणाचे प्रमोशन तर कुणी सेवानिवृत्तीजवळ, CDS बिपीन रावतांसह देशाच्या ‘या’ वीरांनीही गमावले प्राण!

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा दाखला देत हा खासदार म्हणाला... अर्धवटराव
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
आमदाराची पोलीस निरीक्षकाला सस्पेंड करण्याची धमकी, कारण अगदीच शुल्लक
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस? कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
पंकजा मुंडे यांच्या नाराजीची भाजपकडून दखल, बावनकुळे स्पष्ट म्हणाले...
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
MPSC परीक्षा पास पण हाकतोय मेंढ्या, पण का? व्हिडीओ होतोय व्हायरल
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
बहिणीसाठी भाऊ पुढं सरसावला, पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडेंनी काय केलं?
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
आधी लगीन कोंढाण्याचं.. बाप्पासाठी तानाजी मालुसरे यांचा ऐतिहासिक देखावा
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
मोबाईल चार्जिंगला लावून दुर्लक्ष करताय? मग काळजीपूर्वक बघा व्हिडीओ
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी २१ फुटी रथ, बघा रथाची पहिली झलक
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?
चिखलात लोळून लोकांनी कुठं केलं आंदोलन? आक्रमक स्थानिकांची मागणी काय?