AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज ठरतात का? याचा विचार करायला हवा, विजय वडेट्टीवार असे का म्हणाले?

शाहू महाराजांमुळे राज्यात सोशित, वंचित घटकाला आरक्षण दिलं आहे. त्यांच्या वंशजाने आता जो निर्णय घेतला आहे, त्यावरून खरचं ते शाहू महाराजांचे वंशज ठरतात का? याचा विचार करायला हवा, असे वक्तव्य विजय वडेट्टीवर यांनी केले आहे.

संभाजीराजे खरंच शाहू महाराजांचे वंशज ठरतात का? याचा विचार करायला हवा, विजय वडेट्टीवार असे का म्हणाले?
मंत्री विजय वडेट्टीवार यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 5:09 PM
Share

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून ओबीसी आरक्षणाचं (OBC Reservation) घोंगड भिजत पडलंय. त्याचबरोबर मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दाही प्रलंबित आहे. ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचे दोन्ही मुद्दे सध्या कोर्टात आहेत. राज्य सरकारला दणका देत स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे. त्यातबरोबर मराठा आरक्षणासाठी आता छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhaji Raje) यांनी उपोषणाची हाक दिलीय. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, संभाजीराजे म्हणलेत की गरज पडली तर ओबीसी समाजासाठी देखील रस्त्यावर उतरेल. त्यांनी लक्षात घ्यावं शाहू महाराजांमुळे राज्यात सोशित, वंचित घटकाला आरक्षण दिलं आहे. त्यांच्या वंशजाने आता जो निर्णय घेतला आहे, त्यावरून खरचं ते शाहू महाराजांचे वंशज ठरतात का? याचा विचार करायला हवा, असे वक्तव्य विजय वडेट्टीवर यांनी केले आहे.

दोन्ही हाहात तलवारी, वार कुणावर?

खासदार संभाजीराजेंनी उपोषणाची हाक दिल्यापासून राज्यातलं वातावरण पुन्हा तापलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्याने पुन्हा धग धरली आहे. यावरच मंत्री विजय वडेट्टीवार बोलत होते, संभाजीराजे यांनी म्हटले आहे, ओबीसी समाजासाठी देखील रस्त्यावर उतरू तर त्यांनी लक्षात घ्यावं, लढाई करताना एका हातात तलवार असते, एका हातात ढाल असते. ढाल हातात घेऊन संरक्षण केलं जातं आणि तलवारीने वार केले जातात. आता हातात दोन तलवारी घेऊन नेमकं संभाजीराजे संरक्षण कुणाचं करणार आणि वार कुणावर करणार हा आता प्रश्न आहे, असा सवाल विजय वडेट्टीवारांनी विचारला आहे. आता लवकरच ओबीसी आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटणार की तो आणखी गुंतत जाणार हे लवकरच कळेल.

लवकरच ओबीसी मेळावा

तसेच 25 फेब्रुवारीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ओबीसी व्हीजेएनटी बहुजन परीषद ही संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा कार्यक्रम त्याठिकाणी पार पडेल. या संघटनेच्या माध्यमातून अनेक छोट्या संघटना एकत्र येणार आहेत आणि त्यामाध्यमातून प्रत्येक जिल्हावार मेळावे घेण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर लवकरच मुंबईतील आझाद मैदानात संघटनेचे अधिवेशन होईल. 50 लाख ओबीसीची आत्तापर्यंत नोदणी झाली आहे. अशी माहितीही यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

Narayan Rane Press Conference : ‘ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील’, राणेंच्या वक्तव्यावर गंभीर वातावरणही मोकळं झालं

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे

औरंगाबादः शेतकऱ्यांना लुटणाऱ्या 30-30 घोटाळ्याच्या सूत्रधाराचा जामीन नामंजूर, सत्र न्यायालयाचा निकाल

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.