बँका रिकाम्या झाल्या, पैशांची गुंतवणूक करू नका, परत मिळणार नाही, लॉकडाऊन सारखे दिवस… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना पैसे गुंतवणूक न करण्याचा धक्कादायक सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, बँका रिकाम्या झाल्या असून, गुंतवणूक केलेला पैसा परत मिळणार नाही, तसेच 'लॉकडाऊन'सारखे दिवस परत येऊ शकतात.

बँका रिकाम्या झाल्या, पैशांची गुंतवणूक करू नका, परत मिळणार नाही, लॉकडाऊन सारखे दिवस... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 28, 2026 | 10:20 AM

राज्यासह संपूर्ण देशात इंधन दरवाढ होत आहे. रोजच पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीचे भाव वाढत आहे. त्यामुळे महागाईही शिगेला पोहोचली आहे. परिणामी सर्वसामान्य नागरिक होरपळून निघाला आहे. पंतप्रधानांनी तर आधीच परदेश दौरे करू नका, सोने खरेदी करू नका म्हणून काटकसरीचा सल्ला दिला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर थेट पैसे गुंतवणूक करू नका म्हणून सांगितलं आहे. पैसा गुंतवला तर तो परत मिळणार नाही. परत लॉकडाऊन सारखे दिवस येणार आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. लॉकडाऊन सारखी परिस्थितीचे दिवस येणार आहेत. असलेले पैसे सुरक्षित ठेवा. कुठे फार काही गुंतवणूक करू नका? ही गुंतवणूक केली तर ती परत येणार नाही. बँका रिकाम्या झाल्या आहेत. रिझर्व बँक रिकामी झाली आहे. रिझर्व्ह बँकेचा पैसा स्वतःच्या मालकीचा असल्यासारखे काढून घेण्याचे काम सुरू आहे. भविष्यात बँकाही पूर्णता उद्ध्वस्त होतील. सगळ्याच बाजूने देश संकटात आहे. अडचणीत आहे. फक्त इव्हेंटवर भर दिला जात आहे. ते सगळ्याच बाजूने अडचणीत आहेत. फक्त इव्हेंटवर भर दिला जात आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत उमेदवार फायनल होत नाही…

यावेळी त्यांनी विधानपरिषद निवडणुकीतील मतदारांच्या पळवापळवीवरूनही सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. कोण कुठे गेले हे मला सांगायची गरज नाही. जोपर्यंत उमेदवार फायनल होत नाही. उमेदवार एकदा निश्चित झाला का सगळे परत येतील. अस मला वाटतं. भाजपचा उमेदवार अजून निश्चित झालेल्या नाही. त्यांच्या आपसात वाटाघाटी झालेल्या दिसत नाहीत. आतापासून चर्चा करण्यापेक्षा उमेदवार निश्चितीनंतर यावर चर्चा करू, असं वडेट्टीवार म्हणाले.

लोकांना भडकवलं जात आहे

बकरी ईदच्या दिवशी कल्याणमध्ये तणाव झाला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. देशात ध्रुवीकरण करण्याचं वातावरण सुरू आहे. तेढ निर्माण करण्याचा धंदा झालेला आहे. यांनी जाहीरनाम्यातच तसं टाकायला पाहिजे. संविधानाची भाषा कशाला करायची? दोन धर्मामध्ये ते निर्माण करण्याचे काम सतत सुरू आहे. मंत्री असंवेदनशील आहेत. हिंदू-मुस्लीम हा त्रस्त आहे, लोक त्रस्त आहेत. हे सगळं असताना विचारावप पडदा काय टाकायचा? आवश्यक महत्त्वाचे प्रश्न आहे, त्याला बगल द्यायची हा राजरोसपणे धंदा सुरू आहे. जनतेच्या भावना भडकवायच्या, तणाव निर्माण करायचं राजकारण करायचं आणि लोकांना मारायचं सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

 

 

Follow Us