AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लहानपणी ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं तोच आता विरोधात उभा राहणार, Fifa World Cup Final पूर्वी एक अनोखी बाब समोर

19 वर्षांपूर्वी, एका फोटोशूटदरम्यान, मेस्सीने एका लहान बाळाला बाथटबमध्ये घेऊन स्वतःच्या हातांनी अंघोळ घातली होती. आता तोच लहान मुलगा त्याच्याविरोधात खेळणार आहे.

लहानपणी ज्याला अंगा खांद्यावर खेळवलं तोच आता विरोधात उभा राहणार, Fifa World Cup Final पूर्वी एक अनोखी बाब समोर
messi and lamine yamal
| Updated on: Jul 16, 2026 | 1:09 PM
Share

फिफा विश्वचषक आता अंतिम लढतीत पोहोचला आहे. फिफा विश्वचषकासाठी दोन संघानी आपला दावा केला. अर्जेंटिना आणि स्पेन हे दोन्ही संघ आता विजेतेपदासाठी एकमेकांविरुद्ध लढतील. या विश्वचषक अंतिम सामन्यात एक असा योगायोगही पाहायला मिळेल, जो जगाला चकित करेल. खरे तर, 19 वर्षांपूर्वी, एका चॅरिटी फोटोशूटदरम्यान, मेस्सीने एका लहान बाळाला बाथटबमध्ये घेऊन स्वतःच्या हातांनी अंघोळ घातली होती. त्याला किंवा इतर कोणालाही कल्पना नव्हती की एक दिवस तेच बाळ फुटबॉलच्या सर्वात मोठ्या सामन्यात त्याच्यासमोर उभे राहील. ते बाळ दुसरे कोणी नसून स्पेनचा लामिन यामाल आहे.

2007 मध्ये जेव्हा 20 वर्षीय मेस्सीने कॅटलान वृत्तपत्र ‘डायरिओ स्पोर्ट’साठी युनिसेफच्या चॅरिटी कॅलेंडरच्या फोटोशूटमध्ये भाग घेतला होता. या मोहिमेअंतर्गत मेस्सीने स्थानिक कुटुंबांसोबत जोडण्यात आले होते आणि योगायोगाने, मेस्सीला लामिन यामाल नावाच्या मुलगा फोटोशूटसाठी भेटलाले. त्याने त्या बाळाला प्रेमाने अंघोळ घातली आणि फोटोंसाठी त्याला उचलून घेतले, त्यावेळी त्याला कल्पनाही नव्हती की हे बाळ पुढे जाऊन फुटबॉलच्या जगात एक मोठा स्टार बनेल.

2024 मध्ये सर्व काही बदलले, जेव्हा यामालच्या वडिलांनी हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो झटपट व्हायरल झाले आणि मेस्सीच्या मिठीत दिसणारा तो मुलगा आता बार्सिलोनाचा नवीन ‘वंडरकिड’ बनला आहे हे जाणून जगभरातील चाहते चकित झाले. यामाल अजूनही किशोरवयीन असूनही, त्याने क्लब आणि देशासाठी एकामागून एक विक्रम मोडले आहेत आणि तो स्पेनच्या नवीन पिढीचा एक महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. उत्कृष्ट ड्रिब्लिंग, उत्तम दूरदृष्टी आणि वयापेक्षा अधिक शहाणपण यांमुळे त्याने विश्वचषकात इतकी जबरदस्त कामगिरी केली की अनेकांनी त्याला फुटबॉलचा पुढचा जागतिक सुपरस्टार म्हणून ओळखले आहे.

मेस्सी आता वयाच्या 39 व्या वर्षी ही त्याच ताकदीने फिफा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे। अर्जेंटिनाच्या कर्णधाराने अनुभव आणि आपल्या अफाट प्रतिभेच्या जोरावर आणखी एक संस्मरणीय विश्वचषक जिंकून देण्याच्या तयारीत आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत पाहायला मिळाली, जिथे सामन्याच्या अखेरीस दिलेल्या दोन शानदार असिस्टमुळे पराभवाचे विजयात रूपांतर झाले आणि गतविजेत्यांना पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचवले.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक