AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed Vilas Ghule Case : विलास घुले प्रकरणात धक्कादायक वळण, थेट उमेश मानेवर गुन्हा दाखल, महिलेने..

विलास घुले हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. त्यामध्येच आता या प्रकरणासंदर्भातच अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला. थेट उमेश माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. यासोबतच गंभीर आरोपही करण्यात आलीत.

Beed Vilas Ghule Case : विलास घुले प्रकरणात धक्कादायक वळण, थेट उमेश मानेवर गुन्हा दाखल, महिलेने..
Vilas Ghule Case
| Updated on: Jul 16, 2026 | 10:11 AM
Share

बीडच्या केज येथील विलास घुले हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. उमेश माने याला मारहाण होत असताना वाचवण्यासाठी गेलेल्या विलास घुले याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचे नाव आल्याने खळबळ उडाली. ज्यावेळी विलास घुले याला मारहाण होत होती, त्यावेळी मारेकरी हे साैरभ बजरंग सोनवणे याचे नाव घेत होते. मुख्य आरोपीला या प्रकरणात अटक करा, या मागणीसाठी केज शहरात मोठा मोर्चाही निघाला. विलास घुले याच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले. सातत्याने घुले कुटुंबियांवर बजरंग सोनवणे यांचा मुलगा साैरभ सोनवणे याच्यावर आरोप केले जात आहेत. खऱ्या सूत्रधाराला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आहे.

त्यामध्येच या प्रकरणात वेगळे वळण आले असून विलास घुले ज्या उमेश माने याला वाचवण्यासाठी गेला होता, त्याच्यावरच आता गुन्हा दाखल करण्यात आला. हे प्रकरण वेगळ्या दिशेला घेऊन जाण्यासाठी मुद्द्याम खोटे आरोप केले जात असल्याचे सांगितले जातंय. एका महिलेने विलास घुले प्रकपणात उमेश माने याच्यावर गंभीर आरोप केली होती. अखेर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, उमेश माने हा महिलेवर जबरदस्तीने अत्याचार करत होता. तिचे काही आक्षेपार्ह व्हिडीओही त्याने तयार केली होती. तेच व्हिडीओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जात होती. त्यानंतर पिडितेने हा प्रकार आपल्या कुटुंबियांना सांगितला. कुटुंबिय तक्रार देण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये निघाले असता उमेश माने याने जीवे मारण्याची धमकी दिली.

भीतीपोटी त्यांनी पोलिसात तक्रार दिली नाही. शेतातील घर सोडून ते गावी राहण्यास आले. गावात गेल्यावरही पिडितेचा छळ थांबला नाही. उमेश माने आणि विलास घुले सतत तिच्या घराभोवती चक्कर मारायचे. तुला आणि तुझ्या पतीला जीवे मारू असेल धमकी द्यायचे. 20 जूनच्या रात्रीही तेच घडले. तू बाहेर ये तुला खल्लास करतो म्हणून त्यांनी धमकी दिली. त्यानंतर पीडितेचे वडील, पती आणि इतर काही नातेवाईक यांना समजवण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले.

तिथे वाद वाढला आणि विलास आणि उमेश यांनी काचेच्या बाटल्या आणि विटा फेकल्या. बेदम मारहाण सुरू केली. यावेळी माझ्या वडिलांनी स्वत:च्या बचावासाठी हात उचलला असता विलास घुले याचा झटपटीत मृत्यू झाला, असा दावा पीडितेने केला. यानंतर उमेश माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा