AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकांचा तीन दिवसांचा संप, कोणत्या सेवांवर परिणाम होणार, बँकांची ग्राहकांसाठी सूचना

बँकांच्या संघटनांनी पाच आठवडा काम आणि इतर मागण्यांसाठी येत्या २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३ दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे बँकांच्या व्यवहारावर परिणाम होणार आहे.

बँकांचा तीन दिवसांचा संप, कोणत्या सेवांवर परिणाम होणार, बँकांची ग्राहकांसाठी सूचना
bank strike
| Updated on: Sep 24, 2026 | 5:42 PM
Share

पाच दिवसांचा आठवडा जाहीर करणे, ‘कामगिरीवर आधारित प्रोत्साहन’ (PLI) योजना मागे घेणे या प्रमुख मागण्यासह विविध मागण्यांसाठी बँकांनी तीन दिवसाचा देशव्यापी संप जाहीर केला आहे. येत्या २८ ते ३० सप्टेंबर रोजी हा देशव्यापी संप होणार असून सार्वजनिक क्षेत्रातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) आणि ‘इंडियन बँक’ यांनी ग्राहकांना सूचना जारी केली आहे. त्यामुळे ग्राहकांनी आपली कामे २८ तारखेच्या आधीच पूर्ण करावीत अशी आवाहन करण्यात येत आहे.

२६ सप्टेंबर रोजी चौथा शनिवार असल्याने आणि त्या दिवशी बँकेची सुट्टी आहे. या सलग सुट्ट्यांच्या काळात (extended weekend) बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांना (RRBs) २७ सप्टेंबर या रविवारी नेहमीप्रमाणे कामकाज करण्याची परवानगी दिली आहे; त्यानुसार बँकांच्या सर्व शाखा, कार्यालये, एटीएम-संलग्न शाखा आणि ‘करन्सी चेस्ट्स’ (रोख रकमेची साठवणूक करणारी केंद्रे) पूर्णपणे कार्यरत राहतील.

बँक संघटनांनी पुकारलेल्या तीन दिवसांच्या देशव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर, सार्वजनिक क्षेत्रातील ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) आणि ‘इंडियन बँक’ यांनी ग्राहकांना त्यांचे महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.

‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (UFBU) तीन दिवसांच्या देशव्यापी संपाची हाक दिली आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांनीही या संपाला पाठिंबा दिला आहे. हा संप ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या खात्यांच्या सहामाही लेखासमाप्तीच्या (half-yearly closing) कालावधीत होत आहे. यामुळे तिजोरीविषयक कामकाज (treasury operations), धनादेश वटवण्याची प्रक्रिया (cheque clearing) आणि कॉर्पोरेट व्यवहार विस्कळीत होऊ शकतात.

प्रिय ग्राहकांनो

बँक कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी २८ ते ३० सप्टेंबर या कालावधीत ३ दिवसांचा संप पुकारला आहे. त्यामुळे कृपया तुमचे महत्त्वाचे व्यवहार आधीच पूर्ण करून घ्या. एटीएम/एडीडब्ल्यूएम (ADWMs), सीएसपी (CSPs), योनो (YONO), इंटरनेट/मोबाइल बँकिंग, यूपीआय (UPI) आणि इतर डिजिटल माध्यमांचा वापर करा,” असे एसबीआयने (SBI) मंगळवारी सायंकाळी ग्राहकांसाठी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा