कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या कुशीत दोन लेकरं, गावात एकही चूल पेटली नाही, हृदयपिळवून टाकणारा..

Dharashiv Ashwini Paul Case : कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या निर्णयाने मोठी खळबळ उडाली. त्यातच आता मोठी माहिती पुढे येत आहे. अश्विनी पौळ यांच्या वडिलांनी अत्यंत गंभीर आरोप केली. सासरच्या लोकांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात होता.

कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या कुशीत दोन लेकरं, गावात एकही चूल पेटली नाही, हृदयपिळवून टाकणारा..
Ashwini Paul
| Updated on: Sep 06, 2026 | 9:16 AM

खवड्या डोंगरावरील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. त्यानंतर धाराशिवच्या नळदुर्ग किल्ल्यावरही धक्कादायक घटना घडली. कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी नळदुर्ग किल्ल्यावर जाऊन थक करणारा निर्णय घेतला. आपल्या तीन मुलांसह त्यांनी किल्लावरून उडी घेतली. ज्यात एक मुलगी, मुलगा आणि अश्विनी यांनी जगाचा निरोप घेतला. एका मुलीवर धाराशिवमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तिचीही झुंज संपली. कुस्तीपटू अश्विनी पौळ यांच्या खासगी आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठा कलह सुरू होता. मुंबईतील नोकरी सोडून त्या आपल्या आई वडिलांच्या घरी तीन मुलांना घेऊन राहत होत्या. सासरच्या लोकांकडून त्यांना प्रचंड त्रास दिला जात होता. अखेर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कळतंय. या प्रकरणात पोलिसांकडून तपास केला जात आहे.

उमरगा तालुक्यातील व्हंताळ माहेर असलेल्या ठिकाणी अश्विनी पौळ यांच्यासह त्यांच्या दोन लेकरांचा चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आली. यादरम्यान संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होते. अश्विनी यांच्या चितेवर त्यांचा भाऊ सूर्याजी मोहित यांनी मुखाग्नी दिला. आईच्या कुशीत वाढलेल्या लेकरांना आईसोबतच जगाचा निरोप घेताना पाहून सर्वांचेच डोळे पाणावले.

व्हंताळ गावात या घटनेनंतर एकाही घरी चूल पेटली नाही. दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन मुलांसह किल्ल्यामध्ये प्रवेश केला. यादरम्यान त्यांच्यासोबत केक आणि काही चॉकलेटही होती. मात्र, किल्ल्याच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना केक वरती घेऊन जाऊ दिला नाही तर त्यांनी किल्ल्याच्या गेटजवळच आपल्या लेकरांसोबत केक कट केला आणि त्यांना खाऊ घातला.

किल्ल्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले होते की, माझा नवरा मागून येत आहे. अश्विनी पौळ यांचे वडील पेशाने शिक्षक आहेत. आपल्या मुलीसोबत नक्की काय घडत होते, हे त्यांनी सांगितले. मुंबईमध्ये अश्विनी या नोकरी करत होत्या. मात्र, नवऱ्याने त्यांच्यावर ही नोकरी सोडण्यासाठी दबाव टाकला. मुंबईतील नोकरीच्या राजीनामा देऊन त्या गावी परतल्या होत्या. मात्र, सासरच्या लोकांकडून त्यांना त्रास देणे सुरूच होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us