AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, दुसरीकडे नाशिकमधील गावकरी गुजरातमध्ये सामील होण्यासाठी ठाम…

एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देश अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. पण आजवर मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळे आम्हालाही गुजरातमध्ये विलीन करा अशी मागणी केली आहे.

एकीकडे कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद, दुसरीकडे नाशिकमधील गावकरी गुजरातमध्ये सामील होण्यासाठी ठाम...
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 05, 2022 | 12:56 PM
Share

नाशिक : नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील काही गावांनी गुजरातमध्ये सामील होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुरगाणा तहसीलदार यांना याबाबत काही गावकऱ्यांनी निवेदन देखील दिले होते. त्यानंतर आता गुजरातच्या अहवा जिल्हाधिकाऱ्यांना देखील निवेदन देण्यासाठी सुरगाणा तालुक्यातील काही गावकरी जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी घेतलेली भूमिका पाहता लोकप्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी गावकऱ्यांच्या भेटीसाठी तयारी करत आहे. संवाद साधून गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमा वाद सुरू असतांना जत मधील नागरिक आक्रमक झाले आहे. त्याचपार्श्वभूमीवर नाशिकमधील नागरिक आक्रमक झाले आहे. ही सर्व परिस्थिती चर्चेचा विषय असतांना नाशिकमधील काही गावांनीही आम्हाला गुजरातमध्ये विलीन करा अशी मागणी केली आहे. त्यामुळे सीमा प्रश्नाचा वाद सुरू असतांना नाशिक जिल्ह्यातील गावकऱ्यांनी केलेली मागणीवरुन नवा मुद्दा समोर आला आहे.

एकीकडे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाल्याने संपूर्ण देश अमृतमहोत्सवी वर्ष साजरा करत आहे. पण आजवर मूलभूत सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळे आम्हालाही गुजरातमध्ये विलीन करा अशी मागणी केली आहे.

रस्ते, आरोग्य, शिक्षण, इंटरनेट सेवा, वीज यांसह शिक्षणाचा मुद्दा मांडत महाराष्ट्र आणि गुजरातची तुलनाकरून पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान आहे पण 71 वर्षे उलटून गेले तरी सुखसोयी उपलब्ध न झाल्याने गुजरातमध्ये विलीन करून द्यावे अशी मागणी केली आहे.

इतकंच कायतर पेसा कायद्याचा संदर्भ देत पाच वर्षात विकास झाला नाही तर एकमुखाने ठराव करून विधानसभेत पाठविण्यात येईल आणि मूळ गुजरात असलेली गावे पुन्हा तिकडे विलीन करून घेऊ असा इशारा देखील दिला आहे.

नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेल्या गावकऱ्यांनी सुरगाणा तालुक्याचे तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले होते त्यानंतर आता डांग अहवा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राजयाच्या सीमा प्रश्नाचा वाद चिघळलेला असतांना हीच संधी साधून सुरगाणा तालुक्यातील गावकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन देऊन मोठी मागणी केली आहे.

गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात विकासकामांचा मोठा उल्लेख करत महाराष्ट्र कसा मागास राहिला आहे, नाशिक आणि सूरत सारखेच अंतर असतांना गुजरातमधील सुविधा कशा सवलतीत आणि उत्तम दर्जाचा आहे याचाही पाढा वाचला आहे.

सुरगाणा तालुक्यातील गावकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात महाराष्ट्र राज्य आणि गुजरात राज्याची तुलना करत मूलभूत सुविधांपासून कसे वंचित आहोत याचा तुलनात्मक लेखाजोखाच मांडला आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?