AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाण्यामुळे पाय घसरला अन् बाळ 21 व्या मजल्यावरुन…, विरारमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत

विरारच्या बोळींज येथील जॉय विले टाऊनशिपमधील २१ व्या मजल्यावरून सात महिन्यांच्या बाळाचा पडून मृत्यू झाला. आई खिडकी बंद करत असताना बाळाचा तोल गेला. घटनास्थळीच बाळाचा मृत्यू झाला. पोलीस याबाबत अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करून तपास करत आहेत. पूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

पाण्यामुळे पाय घसरला अन् बाळ 21 व्या मजल्यावरुन..., विरारमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी अंत
virar baby death
| Updated on: Apr 24, 2025 | 3:56 PM
Share

विरारमध्ये एका सात महिन्याच्या बाळाचा २१ व्या मजल्यावरुन खाली पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पश्चिम येथील बोळींज भागातील जॉय विले टाऊनशिपमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विरारमधील बोळींज भागात जॉय विले टाऊनशीप प्रोजेक्ट आहे. या टाऊनशीप प्रोजेक्टमधील पिनॅकल इमारतीत विकी सदाने आणि पूजा सदाने हे दांपत्य 21 व्या मजल्यावरील २१०४ या फ्लॅटमध्ये राहतात. त्यांना सात वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बाळ झाले होते. त्या बाळाला नुकतंच सात महिने पूर्ण झाले होते.

बुधवारी (२३ एप्रिल) दुपारी सव्वा तीनच्या सुमारास पूजा सदाने या बाळाला खांद्यावर घेऊन खिडकी बंद करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी खिडकीजवळ सांडलेल्या पाण्यामुळे त्यांचा पाय घसरला. त्यानंतर त्यांचा तोल गेला आणि त्यांच्या खांद्यावर असलेले बाळ २१ व्या मजल्यावरुन खाली पडले. त्याचा बाळाचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे सदाने दांपत्याला ७ वर्षांनंतर बाळ झाले होते. मंगळवारी बाळाला ७ महिने पूर्ण झाले होते.

खिडकी बंद करत असताना अपघात

या घटनेच्या वेळी बाळाचे वडील विकी सदाने कामावर गेले होते. काही नातेवाईक घरी बाळाला भेटण्यासाठी आले होते. बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा सदाने खिडकी बंद करत असताना हा अपघात घडला. त्यांच्या घराच्या खिडकीला पूर्णपणे जाळी नव्हती.

या प्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस याबद्दल अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर सदाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत