AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चर्चा सुरूये मारकडवाडीची, पण महाराष्ट्राच्या ‘या’ गावातील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मोकळे

सध्या मारकडवाडीचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घ्यावं अशी येथील नागरिकांची मागणी आहे. मात्र या मागणीसाठी प्रशासन तयार नसल्यानं वातावरण चांगलंच तापलं आहे.

चर्चा सुरूये मारकडवाडीची, पण महाराष्ट्राच्या 'या' गावातील ग्रामस्थ बॅलेट पेपरवर मतदान घेऊन मोकळे
| Updated on: Dec 08, 2024 | 6:19 PM
Share

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकडवाडी गावातील नागरिकांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आला आहे. आम्हाला ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान करण्याची (मॉक पोल) परवानगी देण्यात यावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे.  मात्र या मतदान प्रक्रियेला प्रशासनाकडून विरोध केला जात आहे. त्यामुळे गावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांकडून देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या गावात उत्तम जानकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्येकवेळी गावातून जानकर यांना मतांची लीड मिळाली आहे. मात्र यावेळी राम सातपुते यांना गावातून मोठ्या प्रमाणात मतदान झालं, त्यामुळे ग्रामस्थांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे आम्हाला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी येथील नागरिकांकडून करण्यात आली आहे.

दरम्यान आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील या गावाला भेट दिली.  शरद पवारांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधला. मारकडवाडीमधील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा ( मॉक पोलिंग) चा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी जमावबंदी लागू केल्यामुळे मॉक पोलिंग होऊ शकलं नाही. यावर आता शरद पवार यांनी एक पर्याय सूचवला आहे.  तालुक्याच्या सर्व गावात ठराव करा. आम्हाला ईव्हीएमवर मतदान नको. जुन्यापद्धतीने मतदान करायचं आहे असा. आणि त्या ठरावाची प्रत तुम्ही उत्तम जनकर यांच्याकडे द्या, त्यावर आम्ही निर्णय घेऊ असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान एकीकडे मारकडवाडीत मॉक पोलिंगवरून गोंधळ सुरू असतानाच दुसरीकडे नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील असलोद गावात बॅलेट पेपरवर मतदान झालं आहे. मात्र हे मतदान निवडणुकीच्या मतदानासाठी नव्हतं तर ते दारू बंदीसाठी झालं आहे.  या गावातील 1216 पैकी 677 महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. दारू बंदीसाठी महिलांनी मतपत्रिकांवर मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीचा निकाल काय लागणार? गावात दारू बंदी होणार की नाही होणार? याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना