Wardha Murder | वर्ध्यात पैश्याचा वादातून हत्या, दुचाकीसह मृतदेह विहिरीत फेकला; सात दिवसांपासून बेपत्ता, चौघांना अटक

मृतक महेंद्र शिंगाणे हा नगरपालिका कार्यालयात सफाई जमादार म्हणून कार्यरत होता. तो नेताजी वॉर्डात वास्तव्य करीत होता. महेंद्र याला विविध प्रकारचे व्यसन होते. त्यामुळं त्याची पत्नी आणि मुलासह त्याचा नेहमीच वाद होत असे. याच कारणातून पत्नी व मुलाने सहा महिन्यापूर्वी नेताजी वॉर्डातील घर सोडून ते दोघे राधाकृष्ण नगरीत राहायला गेले.

Wardha Murder | वर्ध्यात पैश्याचा वादातून हत्या, दुचाकीसह मृतदेह विहिरीत फेकला; सात दिवसांपासून बेपत्ता, चौघांना अटक
वर्ध्यात पैश्याचा वादातून हत्या, दुचाकीसह मृतदेह विहिरीत फेकला;
Image Credit source: t v 9
चेतन व्यास

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 02, 2022 | 6:04 PM

वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या आर्वी (Arvi) येथे पैश्याच्या वादातून इसमाची हत्या करण्यात आली. दुचाकीसह मृतदेह विहिरीत फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी चौघाना अटक केलीय. मृतक हा नगरपालिका कर्मचारी (Municipal staff) होता. तो सात दिवसांपासून बेपत्ता होता. मृतकाला दारूचे व्यसन असून, अंगावर सोन्याचे आभूषण घालण्याची आवड होती. यातूनच नेहमी संपर्कात राहणाऱ्यांनी हत्येचा कट आखला. महेंद्र रामराव शिंगाणे (Mahendra Ramrao Shingane) ( वय 59) रा. नेताजी वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी अक्षय रमेश सतपाल (वय 23), शेख शाहरुख शेख (वय 28), विनोद दयाराम कुथे (वय 42), मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन (वय 29) सर्व रा. आर्वी अशी आरोपींची नाव आहे. मृतक महेंद्र हा कुणालाही न सांगता त्याच्या दुचाकीने घरातून 25 मे रोजी बाहेर गेला. मात्र, तो परतलाच नाही. याबाबत पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपासाला गती दिली. पोलिसांना तांत्रिक तपासात काही नाव आढळून आले.

दागिने, पैसे लुटले

पोलिसांनी अक्षय सतपाल आणि शेख शाहरुख याला बुधवारी ताब्यात घेत विचारपूस केली. त्यांनी घटनेची हकिकत सांगितली. सोबतच घटनेत विनोद दयाराम कुथे, मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन यांचा सुद्धा सहभाग असल्याच सांगितलं. आरोपीनी 25 मे रोजी मृतकाला गावाबाहेर बोलावले. त्याच्याजवळील सोन्याचे दागिने आणि पैसे लुटले. नंतर त्याचा दोरीने गळा आवळत त्याच्याजवळील दुचाकीसाह त्याचा मृतदेह हा विहिरीत फेकला असल्याची माहिती आर्वीचे पोलीस निरीक्षक भानुदास पिदुडकर यांनी दिली. पोलिसांना आरोपीनी घटनेची हकिकत सांगताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. रात्री उशिरा मृतदेहासह दुचाकी विहिरीतून बाहेर काढली. आरोपींनी मृतकाजवळील पाच सोन्याच्या अंगठ्या, सोन्याचे 2 गोफ आणि रोख रक्कम लंपास केली. गुरुवारी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी आरोपीवर हत्या, जबरी चोरी, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत हत्येचा कट रचणे यासह विविध कलमन्वये गुन्हा दाखल केलाय.

सायबर सेलच्या मदतीने झाला उलघडा

महेंद्र शिंगाणे हा कुटुंबापासून विभक्त राहत होता. 25 मे रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्याचा फोनही बंद दाखवत होता. भाडेकरुंनी घरी कुलूप असल्याचे सांगितले. आपले वडील अक्कलकोटला गेले असावे, असा अंदाज मुलगा सागर याने लावला. त्यांचा सर्वत्र शोध घेतला. त्याचा तांत्रिक पद्धतीने तपास करून महेंद्रच्या मोबाईलची माहिती काढली. तो आरोपी अक्षय सपकाळ आणि शाहरुख शेख याच्या संपर्कात असल्याचे समजले. महेंद्रच्या ओळखीचे असल्याने त्यांच्यात पैशाचा व्यवहार होत होता. याच वादातून आरोपींनी अपहरण केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी तत्काळ आरोपी अक्षयला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उजेडात आला. हत्येच्या घटनेचा उलगडा झाला.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें