Wardha Crime | शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुम योजनेची बनावट वेबसाईट, वर्ध्यात सायबर सेलकडे तक्रारी

आधी 5600 रुपये भरण्यास सांगितले, त्यानंतर त्यांच्याकडून 28 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. एवढंच नव्हे तर कारंजा घाडगे येथील शेतकऱ्याच्या मोबाईलवर कुसुम योजनेबाबत बनावट लिंक आली. शेतकऱ्याने लिंक ओपन केली असता, आपल्या फायद्याची असल्याचे लक्षात येताच त्यांनी भामट्याने मागितलेली माहिती दिली.

Wardha Crime | शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुम योजनेची बनावट वेबसाईट, वर्ध्यात सायबर सेलकडे तक्रारी
पीएम कुसुम योजनेची बनावट वेबसाईटImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jun 14, 2022 | 9:19 AM

वर्धा : महावितरणमार्फत पीएम कुसुम योजनेंतर्गत ( PM Kusum Yojana) शेतकऱ्यांना सौर पंपासाठी अनुदान दिले जात आहे. अश्यातच या योजनेच्या नावाने बनावट वेबसाईट तयार करून शेतकऱ्यांना गंडा घालणारे सायबर भामटे सक्रिय झाल्याचे चित्र आहे. अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांनी गंडा घातला जात असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत सायबर सेलमध्ये (Cyber ​​Cell) तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनो सावधान! पीएम कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटपासून सावध राहण्याचे आवाहन सायबर सेलकडून करण्यात येत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सौर पंप, ग्रीड कनेक्टेड सौर आणि इतर नवीकरणीय ऊर्जा संयंत्र स्थापित करण्यासाठी प्रधानमंत्री किसान ऊर्जा व उत्थान महा अभियान (Utthan Maha Abhiyan) म्हणजेच पीएम कुसुम योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत 3 एचपी, 5 एचपी आणि 7.5 एचपी क्षमतेचे सौर देण्यात येत आहे.

लिंक व्हायरल

या योजनेची पीएम शब्द खोडून फक्त कुसुम योजना नाव देऊन लिंक व्हायरल केली आहे. व्हॉट्सॲपवर व्हायरल करून त्यात शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती घेऊन आपणांस योजनेचा लाभ मिळाल्याचे सांगितले जाते. प्रथम 5600 रुपये भरून घेतले जात आहे. नंतर शेतकऱ्यांना फोन करून 16 हजार 200 रुपये भरण्यासाठी सांगितले जात आहे. या बनावट लिंकद्वारे अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब पुढे येत आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील शेतकरी या बनावट वेबसाईटला बळी पडत आहे. लाखो रुपयांनी त्यांची फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी सायबर सेलकडे प्राप्त होत आहेत. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

सौर पंप मिळणार असल्याचा बहाणा

आर्वी तालुक्यातील अजनगाव येथील एका शेतकऱ्याच्या मोबाईलवर ‘कुसुम’ योजनेची बनावट लिंक आली. त्या शेतकऱ्याने लिंक ओपन केली असता, माहिती घेण्याच्या बहाण्याने त्याच्या बँक खात्यातून परस्पररीत्या 18 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून त्यांची फसवणूक केली. तर समुद्रपूर तालुक्यातीलच एका वृद्ध शेतकऱ्याच्या मोबाईलवर कुसुम योजनेच्या बनावट वेबसाईटवरून लिंक आली. शेतकऱ्याला सौर पंप मिळणार असल्याने त्यांनीही त्यावर विश्वास ठेवला. आधी 5600 रुपये भरण्यास सांगितले, त्यानंतर त्यांच्याकडून 28 हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली. एवढंच नव्हे तर कारंजा घाडगे येथील शेतकऱ्याच्या मोबाईलवर कुसुम योजनेबाबत बनावट लिंक आली. शेतकऱ्याने लिंक ओपन केली असता, आपल्या फायद्याची असल्याचे लक्षात येताच त्यांनी भामट्याने मागितलेली माहिती दिली. मात्र, टप्प्याटप्प्याने पैशाची मागणी करीत तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांनी शेतकऱ्याला गंडविल्याने त्याने सायबर सेलकडे तक्रार दिली.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांची फसवणूक

सायबर भामट्यांनी पीएम कुसुम योजनेची बनावट वेबसाईट तयार केली आहे. गुगलवरून शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक घेऊन हे भामटे बनावट वेबसाईटची लिंक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाठवित आहेत. लिंक खरी समजून शेतकरी या फसवणुकीला बळी पडून लाखो रुपयांनी त्यांची फसवणूक केली जात आहे. बनावट वेबसाईट आणि मोबाईल अप्लिकेशनच्या अर्जांद्वारे शेतकऱ्यांची फसगत होत आहे. वेबसाईटवर शेतकऱ्यांना नोंदणी शुल्क ऑनलाईन भरण्यास सांगितले जात आहे. बनावट वेबसाईट ही हुबेहूब खऱ्या वेबसाईटसारखीच आहे. तत्सम डोमेन बनवून त्यात किरकोळ बदल करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची अत्यंत गरज आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.