वर्धेतील आर्वी आगाराच्या दोन बसवर दगडफेक, एक चालक किरकोळ जखमी

| Updated on: Nov 28, 2021 | 10:00 PM

आर्वी आगारातून चार बस प्रवासावर आज निघाल्या. यापैकी एका बसवर तळेगाव बसस्थानाकासमोर अज्ञाताने दगड फेकला. यात बसची मागील काच फुटली. दुसऱ्या एका बसवर तळेगाव आष्टी मार्गावर अज्ञात इसमाने दुचाकीने येत दगडफेक केली.

वर्धेतील आर्वी आगाराच्या दोन बसवर दगडफेक, एक चालक किरकोळ जखमी
वर्धेतील आर्वी आगाराच्या दोन बसवर दगडफेक
Follow us on

वर्धा : जिल्ह्यात मागील 32 दिवसांपासून एसटी कामगारांचा संप सुरू आहे. या संपात 1430 कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. दरम्यान, आज या संपात फूट पडली. आर्वी आगारातील आठ कर्मचारी कामावर आले. यामुळे चार बस रस्त्यावर प्रवासाला निघाल्या. मात्र यातील दोन बसवर दगडफेक करण्यात आल्याने बसेसचे नुकसान झाले. या दगडफेकीत एक चालकसुद्धा किरकोळ जखमी झाला आहे.

आर्वी आगारातून चार बस प्रवासावर आज निघाल्या. यापैकी एका बसवर तळेगाव बसस्थानाकासमोर अज्ञाताने दगड फेकला. यात बसची मागील काच फुटली. दुसऱ्या एका बसवर तळेगाव आष्टी मार्गावर अज्ञात इसमाने दुचाकीने येत दगडफेक केली. यात बसची समोरील काच फुटली असून चालक अविनाश पवार किरकोळ जखमी झाले.

कर्मचारी वर्गामध्ये दहशत

बसवर दगडफेक झाल्यावर एसटी प्रशासनाने दोन तक्रारी तळेगाव पोलिसात दाखल केली आहे. तळेगाव पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हे दाखल केले आहे. एकीकडे कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देणार असल्याचं परिवहन मंत्री यांनी सांगितले. त्याला साथ देत कर्मचारी कामावर येत आहे. मात्र अशा घटनांमुळे कामावर येणाऱ्या कर्मचारी वर्गामध्ये दहशत निर्माण होत आहे.

रापमच्या कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरूच

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी रापमच्या कर्मचाऱ्यांनी आपले कामबंद आंदोलन सुरूच ठेवले आहे. शासनासोबत वेळोवेळी चर्चा झाल्यावर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत कामावर रुजू व्हावे असे आवाहन करण्यात आले. पण या आवाहनाकडे आंदोलनकर्त्यांनी पाठ दाखवली आहे. आतापर्यंत रापमच्या वर्धा विभागातील 61 रोजंदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली आहे. तर तब्बल 158 कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात रापमचे पाच आगार असून या आगारांमधून सुमारे 850 बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात येते. पण रविवारी आंदोलनाच्या 32 व्या दिवशीही सकाळपासून आंदोलन कायम राहिले मात्र दुपारी आर्वी आगारातील आठ कर्मचारी कामावर आल्याने चार बस प्रवासावर निघाल्या.

जिल्ह्यात एकूण रापमचे आगार : 05 (वर्धा, पुलगाव , हिंगणघाट , आर्वी,तळेगाव)
एकूण कर्मचारी : 1430
निलंबित कर्मचारी : 158
सेवासमाप्त कंत्राटी कर्मचारी : 61
आज कामावर आलेले कर्मचारी : 8
आज झालेल्या बस फेऱ्या : 04 (Stone pelting on two buses at Arvi depot in Wardha, one driver slightly injured)

इतर बातम्या

Rajesh tope : राज्याला कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा किती धोका? कोणते नवे नियम? आरोग्यमंत्री राजेश टोपे बैठकीआधी म्हणाले…

‘कोरोनाला रोखण्यासाठी जे आवश्यक ते सर्व करा,’ मुख्यमंत्री ठाकरेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश