Wardha Zilla Parishad | वर्धा जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर; पाच गट आणि दहा गणांची वाढ

| Updated on: Jun 03, 2022 | 12:59 PM

पूर्वी जिल्हा परिषदेचे 52 तर पंचायत समितीचे 104 सर्कल होते. आता वर्धा, आष्टी, कारंजा, देवळी व समुद्रपूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गटाची आणि दोन गणांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदचे 57 सर्कल तर पंचायत समितीचे 114 सर्कल झाले आहे.

Wardha Zilla Parishad | वर्धा जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर; पाच गट आणि दहा गणांची वाढ
वर्धा जिल्हा परिषद, पंचायत समितीचे प्रभाग रचनेचे प्रारूप जाहीर
Image Credit source: tv 9
Follow us on

वर्धा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नवीन प्रभाग रचनेचे प्रारूप निवडणूक विभागाकडून (Election Department) जाहीर करण्यात आले आहे. या प्रारूप आराखड्यावर 8 जूनपर्यंत आक्षेप नोंदविण्यास मुदत देण्यात आली आहे. नवीन प्रभाग रचना पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. काहीना राजकीय भवितव्याची (Political Future) चिंता भेडसावू लागली आहे. जिल्ह्यात पाच गट आणि दहा गणांची वाढ सुद्धा करण्यात आलीय. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेचा कार्यकाळ संपला. ओबीसी आरक्षणामुळे (OBC Reservation) निवडणुकीला थोडा ब्रेक लागला आहे. यावर्षी जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता सर्कलमध्येही वाढ करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदचे 57 सर्कल

यामध्ये वर्धा जिल्हा परिषदेचे पाच तर पंचायत समितीच्या दहा सर्कलची वाढ झाली आहे. पूर्वी जिल्हा परिषदेचे 52 तर पंचायत समितीचे 104 सर्कल होते. आता वर्धा, आष्टी, कारंजा, देवळी व समुद्रपूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका गटाची आणि दोन गणांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदचे 57 सर्कल तर पंचायत समितीचे 114 सर्कल झाले आहे. त्यामुळं जास्त सदस्यांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे.

8 जूनपर्यंत आक्षेप नोंदविता येणार

नवीन गट आणि गण तयार झाल्याने प्रभागात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्यात आले आहे. अनेक प्रभागांची तोडफोड करण्यात आल्याने काही राजकीय व्यक्तींना धक्का बसला आहे. काहींना याचा फायदा होणार आहे. या प्रारूप रचनेवर 8 जूनपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. त्यानंतर निश्चिती केली जाणार आहे. असे जरी असले, तरी आक्षेप फार कमी नोंदविले जातात. नोंदविले गेले तरी त्यात फारसा काही बदल होत नाही. थोडाफार बदल केला जातो. त्यामुळं काही जण आक्षेप नोंदवून आपले समाधान करून घेतील.

हे सुद्धा वाचा

गेल्यावेळी भाजपची सत्ता

वर्धा जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता होती. कार्यकाळ संपल्यानं प्रशासक म्हणून जिल्हा परिषद सीईओ काम पाहत आहेत. आधी बावन सदस्य होते. 2017 ला निवडणूक झाली. त्यावेळी भाजप सत्तेवर आले. 52 पैकी 31 जागांवर भाजपचे सदस्य निवडून आले होते. काँग्रेसला फक्त 13 जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी, सेना आणि बसपाला प्रत्येकी फक्त दोन जागा मिळाल्या होत्या. शेतकरी संघटना आणि रिपाईनं प्रत्येकी एक जागा मिळविली होती. वर्ध्यात जिल्हा परिषदेच्या इतिहासात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता राहिलीय. मागील निवडणुकीत 52 पैकी पहिल्यांदाचं भाजपचे 32 उमेदवार निवडून आले आणि स्वबळावर भाजपच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष समवेत कमळ फुललं. यातही राष्ट्रावादीच्या दोन सदस्यांनी भाजपा मतदान केल्यानं विजयी उमेदवारांना मॅजिक फिगर 27 असताना 34 मते भाजपाला मिळाले. यात पहिल्या अडीच वर्षात हिंगणघाट तालुक्याचे नितीन मडावी हे अध्यक्ष तर आर्वी तालुक्याच्या कांचन नांदुरकर उपाध्यक्षपदी विराजमान झाले होतें नंतरच्या अडीच वर्षात कारंजा तालुक्याच्या सरिता गाखरे तर देवळी तालुक्याच्या वैशाली येरावार या उपाध्यक्षपदी होत्या. आता होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पुन्हा हा गढ आपल्याकडे खेचते की भाजपा पुन्हा स्थापन करेल हे पाहणं महत्वाचं ठरेल.