‘मशिदीत दोन पायांवर याल, जाताना स्ट्रेचरवर जाल’, वारिस पठाण यांची नितेश राणेंना धमकी

Waris Pathan vs Nitesh Rane: अहिल्यानगरमधील सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर सकडून टीका केली आहे. मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार या राणेंच्या विधानावर वारिस पठाण यांनी भाष्य करत राणेंनी थेट धमकी दिली आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

मशिदीत दोन पायांवर याल, जाताना स्ट्रेचरवर जाल, वारिस पठाण यांची नितेश राणेंना धमकी
Waris pathan and Nitesh Rane
| Updated on: Oct 10, 2025 | 3:48 PM

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गुरुवारी अहिल्यानगरमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांच्यावर सकडून टीका केली आहे. मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार या राणेंच्या विधानावर वारिस पठाण यांनी भाष्य करत राणेंनी थेट धमकी दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. वारिस पठाण नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

वारिस पठाण यांची नितेश राणेंना धमकी

अहिल्यानगरमधील सभेत बोलताना वारिस पठाण यांनी नितेश राणे यांचा उल्लेख नेपाळी असा करत म्हटले की, ‘मस्जिदमध्ये घुसून मुस्लिमांना मारणार असे नितेश राणे म्हणतात. पण तो दोन पायावर येतील मात्र स्ट्रेचरवर जातील. आम्ही कुणाला भीत नाही. आम्ही संविधानाचा आदर करतो आणि मर्यादा पाळतो. राणे हे द्वेष पसरवण्याचे काम करतात. त्यांना मंत्री बनवलं आहे. मात्र तरीही ते तरीही ते अशी विधाने करत असतात.’

नितेश राणेंचे प्रत्युत्तर

वारिस पठाण यांच्या या टीकेला नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राणे म्हणाले की, ‘जागा आणि वेळ कळवा किंवा मस्जिद निवड. मी तिथे येतो, धमक्या देऊ नका, तुम्हाला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे. मी आधीच म्हटलं की भुंकणारी कुत्री चावत नसतात. ही तर नसबंदीवाली पिलावळ आहे. राज्यातील वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार सभेची परवानगी देतं आहे, म्हणून बोलू शकता, नाहीतर मस्जिदीच्या भोंगेयातून बोलावं लागलं असतं.’

नितेश राणेंची सभेवर टीका

अहिल्यानगरमधील सभेवर बोलताना नितेश राणे म्हणाले की, ‘भोकने वाले कुत्ते काटते नही, ही जी हिंदीत म्हण आहे, याचं उत्तम उदहारण कालची सभा होती. तुम्ही एकाबाजूला म्हणता आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानतो, कायदा-सुव्यवस्था मानतो. पण दुसऱ्याबाजूला महाराष्ट्र सरकारने अहमदनगरच नाव बदलून अहिल्यानगर केलं, औरंगाबादच नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं, ते तुम्हाला मान्य नाही. हे काय तुमच्या अब्बाचं पाकिस्तान, इस्लामाबाद आहे का?’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला आहे.