AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘3 इडियट्स’ चित्रपटासारखा किस्सा, शेतात आशा वर्कर अन् डॉक्टरांकडून महिलेची यशस्वी डिलेव्हरी

विदर्भात शेतात महिलेची प्रसृती झाली. डॉक्टरांच्या ऑपरेशन थिटर ऐवजी खाटीवर खुल्या आकाशात डॉक्टर आणि आशा वर्कर यांनी ही प्रसृती यशस्वी केली. जन्मलेले बाळ आणि त्याची आई सुखरुप आहे. परंतु आईला पुढील उपचारासाठी रुग्णालयता नेण्यात आले.

'3 इडियट्स' चित्रपटासारखा किस्सा, शेतात आशा वर्कर अन् डॉक्टरांकडून महिलेची यशस्वी डिलेव्हरी
महिलीची प्रसृतीची तयारी करताना आशा वर्कर
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Dec 06, 2024 | 3:36 PM
Share

काही वर्षांपूर्वी आलेला अमिर खानचा 3 इडियट्स चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. त्या चित्रपटात अवघड प्रसृती करण्यासंदर्भातील दृश्य होते. डॉक्टरांनी व्हिडिओ कॉलिंगने मार्गदर्शन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रसृती यशस्वी केली होती. त्याला साम्य ठरणारी घटना विदर्भात घडली. विदर्भात कॉलेजमध्ये नाही पण शेतात महिलेची प्रसृती झाली. डॉक्टरांच्या ऑपरेशन थिटर ऐवजी खाटीवर खुल्या आकाशात डॉक्टर आणि आशा वर्कर यांनी ही प्रसृती यशस्वी केली. जन्मलेले बाळ आणि त्याची आई सुखरुप आहे. परंतु आईला पुढील उपचारासाठी रुग्णालयता नेण्यात आले. रुग्णालयात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे शेतातून बैलगाडीत मुख्य रस्त्यापर्यंत त्यानंतर शासनाच्या रुग्णावाहिकेतून महिलेला नेले.

औषधे घेऊन दुचाकीने शेत गाठले

वाशिम जिल्ह्यातील इंझोरी शेत शिवारात राहत असलेल्या महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. सायंकाळच्या सुमारास सास कंट्रोल रूमच्या अजय ढोक यांना फोनवर माहिती मिळाली. एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत आहेत आणि तिची प्रकृती गंभीर आहे, असा हा संदेश होता. अजय ढोक यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्राची एएनएम शारदा वेरूळकर यांना संपर्क साधला. दोघांनी घटनास्थळी जाण्यासाठी दुचाकीचा उपयोग केला. महिलेची प्रसृती केली. तोपर्यंत डॉक्टर त्या ठिकाणी आले.

बैलगाडीतून मुख्य रस्ता गाठला

बाळ आणि आईला पुढील उपचाराची गरज असल्याने त्यांना बैलगाडीतून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले. तिथून 102 रुग्णवाहिकेद्वारे त्यांना कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रसंगात अजय ढोक, शारदा वेरूळकर, डॉक्टर शेख आणि स्थानिक आशा वर्कर सुनिता राठोड यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी दाखवलेले धाडस आणि तत्परता यामुळे एक महत्त्वाचा जीव वाचवण्यात यश आले.

डॉक्टर शेख म्हणतात…

प्रकृती चिंताजनक नसल्यामुळे बैलगाडीतून नेले. त्यानंतर रस्त्यावर शासनाची रुग्णवाहिका उभी होती. डॉक्टर शेख म्हणाले, आम्हाला संदेश मिळाल्यानंतर आधी आशा वर्करला पाठवले. त्यानंतर सर्व औषधे घेऊन मी आलो. महिलीची प्रसृती सामान्य झाली. मुलगा आई आणि सुखरुप आहे. या घटनेत आरोग्य विभागाच्या या कार्याचे संपूर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. डॉक्टर आणि आशा वर्कर यांच्या सेवाभावाला सलाम केला जात आहे. हा प्रसंग ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेच्या तत्परतेचे जिवंत उदाहरण आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना