AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Washim Accident : वाशिममध्ये गाडीचा टायर फुटल्याने पोलिस व्हॅन पलटली, आठ पोलिस कर्मचारी जखमी

वाशिमवरुन कारंजा येथे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी चालले होते. पोलिस गाडी अमरावती महामार्गावरील बिटोडा फाट्याजवळ येताच गाडीचा टायर फुटला. यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Washim Accident : वाशिममध्ये गाडीचा टायर फुटल्याने पोलिस व्हॅन पलटली, आठ पोलिस कर्मचारी जखमी
वाशिममध्ये गाडीचा टायर फुटल्याने पोलिस व्हॅन पलटलीImage Credit source: TV9
| Edited By: वैजंता गोगावले | Updated on: May 02, 2022 | 10:27 PM
Share

वाशिम : ईद निमित्त बंदोबस्तासाठी जात असलेल्या पोलिस व्हॅन (Police Van)चा टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना अमरावती महामार्गावर घडली. या घटनेत 8 पोलिस कर्मचारी जखमी (Injured) झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त झालेले वाहन नुकतेच पोलिस दलात दाखल झाले होते. जखमी पोलिस कर्मचाऱ्यांना उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अपघातस्थळाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला. सर्व कर्मचाऱ्यांची प्रकृती स्थिर आहे. (In Washim, a police van overturned due to a flat tire, injuring eight police)

गाडीचा टायर फुटल्याने घडला अपघात

उद्या देशभरात ईदचा सण साजरा करण्यात येणार आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून राज्यात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे. याचसाठी वाशिमवरुन कारंजा येथे पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी चालले होते. पोलिस गाडी अमरावती महामार्गावरील बिटोडा फाट्याजवळ येताच गाडीचा टायर फुटला. यामुळे गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी पलटी झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आठ कर्मचारी जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. (In Washim, a police van overturned due to a flat tire, injuring eight police)

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?