AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला दावा काय ?

गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपला ही सत्ता मिळाली आहे. त्यात कॉँग्रेसची पिछेहाट झाली आहे, आप च्या मतांचा टक्काही गुजरातमध्ये वाढला आहे.

गुजरातचा विजय लोकशाही पद्धतीने नाही, कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेला दावा काय ?
Image Credit source: Google
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Dec 08, 2022 | 1:03 PM
Share

मुंबई : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यावर भाजपकडून देशभर विजय साजरा केला अजत असतांना कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र या निकालावर भाजपला चिमटे काढले आहे. लोकशाहीची हत्या करून मिळवलेला हा विजय असून तपास यंत्रणांचा गैरवापर करून विजय मिळवला आहे. या निकालावरुण आम्ही त्यांचे स्वागत करतो अशा शुभेच्छा देत पटोले यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. गुजरातमध्ये आपचा काही प्रमाणात कॉँग्रेसला फटका बसला असल्याची चर्चा असतांना नाना पटोले यांनी मात्र त्यावर बोलणं टाळलं आहे. केंद्रात असलेली सत्ता आणि तपास यंत्रणेच्या जोरावर भाजप गैरवापर करून सत्ता मिळवायची असे भाजपचे धोरण असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कोणीही भाजपचे नेते गेले तरी काहीही फरक पडणार नाही, तिथे कोंग्रेसचीच सत्ता येईल असा दावाही नाना पटोले यांनी टीव्ही 9 शी बोलतांना केला आहे.

गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपला जो कौल दिला आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो, परंतु भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मिळवलेली सत्ता आहे असे नाना पटोले यांनी आरोप केला आहे.

गुजरातमध्ये सातव्यांदा भाजपला ही सत्ता मिळाली आहे. त्यात कॉँग्रेसची पिछेहाट झाली आहे, आपच्या मतांचा टक्काही गुजरातमध्ये वाढला आहे.

त्यात हिमाचल प्रदेश मध्ये आपला फारसे यश आले नसले तरी कॉँग्रेसने आघाडी घेतली आहे. त्यात भाजपला तिथे सत्ता गमवावी लागली आहे.

गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी मोदींचा करिश्मा तिथे कायम असल्याचे दिसून येत आहे, याशिवाय कॉँग्रेसची निवडणूक येणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाल्याने कॉँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

ही सर्व परिस्थिती असतांना कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढली होती त्याचाही फारसा परिणाम दिसला नाही, उलट भाजपचे यश अधिक गडद झाल्याचे दिसून आले आहे.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना