गोविंद बर्गेसोबत नक्की घडलं तरी काय? कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून धक्कादायक खुलासे समोर
Govind Berge Death Case: घातपात की आत्महत्या... गोविंद बर्गेसोबत नक्की घडलं तरी काय? पोलिसांच्या तपासात मोठी माहिती समोर... कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून समोर आलं मोठं सत्य..., प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ

Govind Berge Death Case: ‘गोराईयेथील बंगला माझ्या नावावर कर आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेतीची कर… नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल…’ अशा धमक्या मिळत असल्यामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांनी आत्महत्या केली… असं सांगण्यात येत आहे. नर्तिका पूजा गायकवाड हिच्या नादाला लागून गोविंद बर्गे यांनी स्वतःचं आयुष्य गोळी झाडून संपवलं आहे. याप्रकरणी पोलीस सध्या तपास करत आहेत. गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणी पूजा हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे पूजा गायकवाड आता जामिनासाठी अर्ज करु शकते. दरम्यान, गोविंद बर्गे प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, तपास सुरु असताना पोलिसांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. पोलिसांच्या तपासानुसार, गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड अनेक ठिकाणी एकत्र राहिले होते. शिवाय दोघांच्या कॉल डिटेल्स आणि चॅटिंगमधून देखील मोठं सत्य समोर आलं आहे.
यामध्ये स्वतः गोविंद बर्गे यांनी अनेकदा आत्महत्या करण्याच्या धमक्या दिल्याचं देखील कळत आहे. त्यामुळेच पूजा हिच्या घराच्या काही अंतरावर गोविंद यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली असल्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे यामध्ये घातपाताचा काहीही संबंध नसावा… याची देखील चौकशी पोलीस करत आहेत.
View this post on Instagram
एवढंच नाही तर, गोविंद आणि पूजा यांच्यामध्या आर्थिक व्यवहार झाल्याचं देखील उघड झालं आहे. पूजा गायकवाड हिच्या बॅक खात्याचे देखील तपशील समोर आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पूजा गायकवाड हिच्यासोबत काम करणाऱ्या अन्य महिलांचे देखील जबाब नोंदवण्यात आले आहेत.. सध्या गोविंद बर्गे हत्ये प्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बर्गे यांनी पूजा हिला फोन, सोन, जमिन, प्लॉट सर्वकाही दिलं होतं. शिवाय घराती मागणी केल्यानंतर ‘तुला नवीन घर बांधून देतो…’ असं देखील गोविंद बर्गे, पूजा हिला म्हणाले असल्याचं समोर येत आहे. पण दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिनसलं असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
