AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pawanraje Nimbalkar Case : ओमराजेंचे वडिल पवनराजे निंबाळकर डबल मर्डर केस प्रकरण काय आहे? किती लाखांची सुपारी दिलेली? जाणून घ्या सर्वकाही

Pawanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात अखेर आज 20 वर्षांनी निकाल लागला आहे. 2006 साली पवनराजेंची हत्या झाली होती. या हत्येसाठी किती लाखाची सुपारी दिलेली?. अण्णा हजारेंचं सुद्धा नाव या प्रकरणात आलेलं. जाणून घ्या या संपूर्ण प्रकरणाबद्दल.

Pawanraje Nimbalkar Case : ओमराजेंचे वडिल पवनराजे निंबाळकर डबल मर्डर केस प्रकरण काय आहे? किती लाखांची सुपारी दिलेली? जाणून घ्या सर्वकाही
Pawanraje Nimbalkar Case
| Updated on: Jun 20, 2026 | 11:46 AM
Share

खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. कारण तब्बल 20 वर्षानंतर त्यांचे वडिल पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला आहे. वडिलांची हत्या ओमराजेंसाठी आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली. त्यामुळेच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. हे पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण काय होतं? ते जाणून घ्या. पवनराजे निंबाळकर हे धाराशिवमधील प्रतिष्ठीत व्यक्ती होते. राजकारणात त्यांना मानणारा वर्ग होता. हेच त्यांचं राजकीय यश काही जणांना खुपत होतं. त्यातून ही हत्या झाली. पवनराजे मुंबईवरुन धाराशिवला निघालेले असताना दोन मारेकऱ्यांची कळंबोली येथे त्यांची गाडी अडवून धडाधड गोळ्या झाडल्या, त्यात पवनराजे आणि त्यांचा ड्रायव्हर समद काझी या दोघांचा मृत्यू झाला. सध्या धाराशिवचे खासदार असलेले ओमराजे निंबाळकर याच घटनेमुळे राजकारणात आले. तब्बल 15 वर्ष या खटल्याची सुनावणी सुरु होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार पद्सिंह पाटील यांच्यावर भाडोत्री गुंडांमार्फत हत्या घडवल्याचा आरोप होता.

पद्सिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत बंधु आहेत. सीबीआयने पद्सिंह पाटील यांच्या नावाचा मुख्य आरोपी मध्ये समावेश केला. राजकीय आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे पद्सिंह पाटील यांनी पवनराजे निंबाळकर यांना मार्गातून हटवलं. हत्या घडवण्यासाठी भाडोत्री गुंडांना पैसे दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पद्सिंह पाटील हे महाराष्ट्राचे माजी मंत्री असून ते धाराशिवचे माजी खासदार आहेत. राजकीय कारकि‍र्दीत पद्सिंह पाटील यांनी अनेक मंत्रालयं संभाळली. सुनावणी दरम्यान 128 साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्या. यात समाजसेवक अण्णा हजारे सुद्धा होते. माफीचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैनने हे सुद्धा कबूल केलं की, पद्सिंह पाटील यांनी अण्णा हजारेंना मारण्याची सुद्धा सुपारी दिली होती.

किती लाखाची सुपारी दिलेली?

पद्सिंह पाटील, लातूर येथील बिझनेसमन सतीश मंदादे, निवृत्त राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक मोहन शुक्ला आणि हल्लेखोर हे या प्रकरणात आरोपी आहेत. केस रेकॉर्डनुसार , मंदादे आणि शुक्ला यांनी पवनराजे निंबाळकर यांना मारण्यासाठी पारसमल जैनला 30 लाखाची सुपारी दिली. पारसमल जैन नंतर माफीचा साक्षीदार बनला. नवी मुंबई पोलिसांनी सुरुवातीला प्राथमिक तपास केला. मुंबई उच्च न्यायालयाने नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं. पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने हत्येच्या तपासाच्या प्रगतीबद्दल शंका उपस्थित केली होती.

पद्सिंह पाटील यांना जून 2009 मध्ये पहिल्यांदा अटक झाली. अलिबाग येथील सत्र न्यायालयाने त्याचवर्षी सप्टेंबर महिन्यात पद्सिंह पाटील यांना जामीन दिला. जुलै 2011 पासून या प्रकरणात सुनावणी झाली.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!