AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, थेट 20 जूनला…

Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पद्मिसिंह पाटील रुग्णवाहिकेतून कोर्टात हजर झाले. तसेच इतर 9 आरोपी देखील कोर्टात उपस्थित आहेत.

Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट, थेट 20 जूनला...
Pawanraje Nimbalkar
| Updated on: Jun 16, 2026 | 11:50 AM
Share

गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणात आज 16 जून रोजी मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाकडून आज निकाल जाहीर होण्याची शक्यता होती, मात्र कोर्टाने आज निकाल दिला नाही. सुनावणीसाठी आरोपी माजी खासदार पद्मसिंग पाटील सेशन कोर्टात रुग्णवाहीकेतून हजर झाले. आता या प्रकरणाचा निकाल 20 जूनला लागणार असल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

आज विशेष सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सर्व ९ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये मुख्य आरोपी आणि माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचा समावेश आहे. तब्येत ठीक नसल्याने पद्मसिंह पाटील रुग्णवाहिकेद्वारे कोर्टात हजर झाले. मात्र, दीर्घ प्रतीक्षेनंतरही न्यायालयाने आज निकाल जाहीर केला नाही. “निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे,” असे स्पष्ट करत न्यायधीशांनी या प्रकरणाचा निकाल 20 जूनला देणार असल्याचे सांगितले.

20 जूनला लागणार निकाल

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येची घटना तब्बल २० वर्षांपूर्वी घडली होती. या खटल्यामध्ये माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण ९ जणांवर आरोप आहेत. या प्रकरणात गेल्या दोन दशकांत अनेक वेळा सुनावण्या झाल्या, साक्षीदारांच्या जुळवणी, याचिका आणि विलंब यामुळे खटला लांबत गेला. निकालाची सुनावणी सुरू होण्यापूर्वी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

ओमराजे निंबाळकरांनी व्यक्त केल्या भावना

माझे वडील पवनराजे निंबाळकर साहेब व त्यांचे चालक समद काझी यांची निष्ठूर हत्या होऊन सुमारे 20 वर्षे झाली. अजूनही आम्ही दोन्ही कुटुंबीय न्याय होण्याच्या प्रतीक्षेत आहोत. आज न्यायदेवता न्याय करणार आणि ज्यांनी रक्ताच्या नात्याला काळीमा फासला अश्याचा आज फैसला होणार ही अपेक्षा. हा खटला म्हणजे मस्तवाल राजकीय शक्ती व पैशाच्या मस्तीवर लोकांना गुलाम समजणाऱ्या, त्यांच्या जीवाची किंमत नसणाऱ्या, रक्ताच्या नात्याचा घात करणाऱ्या मानसिकतेविरुद्ध हा संघर्ष आहे असे ओमराजे निंबाळकर म्हणाले.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!