मुलीच्या साखरपुड्यात उधळपट्टी म्हणून टीका, इंदुरीकर वर्षाला किती कमवतात? इंजिनिअर, डॉक्टर सगळेच महाराजांसमोर फेल
मुलीच्या साखरपुड्यामध्ये प्रचंड खर्च केला म्हणून सध्या इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेमध्ये आले आहेत. मात्र अनेकांना इंदुरीकर महाराज यांचं उत्पन्न नेमकं किती आहे? हे जाणून घेण्याची देखील उत्सुकता आहे.

समाजप्रभोनकार आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज हे कायम या न त्या कारणाने चर्चेत असतात. दरम्यान ते पुन्हा एकदा चर्चेत आले, त्याला कारण देखील तसंच होतं. इंदुरीकर महाराज नेहमी आपल्या किर्तनामध्ये लोकांना लग्न साधे करण्याचा सल्ला देतात, लग्नावर फार खर्च करू नका असं ते सांगतात. मात्र त्यांनी आपल्या मुलीचा ज्ञानेश्वरी इंदुरीकर यांचा साखरपुडा मात्र मोठ्या थाटात केला. या साखरपुड्यावर करण्यात आलेल्या खर्चामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत आले. महाराज नेहमी लग्नावर खर्च कमी करण्याचा सल्ला देतात, मग त्यांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्यावर एवढा खर्च का केला असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
दरम्यान इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या मुलीच्या साखरपुड्यावर केलेल्या खर्चावरून समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. काही जण महाराजांचं समर्थन करताना दिसत आहेत, तर काहीजण महाराजांच्या विरोधात बोलत आहे. दरम्यान जे समर्थन करत आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार महाराजांनी कर्ज काढून मोठं लग्न करू नका असं म्हटलं आहे. महाराजांकडे पैसा होता, कुठल्याही बापाला आपल्या मुलीला काही कमी पडू नये असं वाटतं, म्हणून त्यांनी खर्च केला असं म्हटलं जात आहे. त्यामुळे आता अनेकांच्या मनात ही देखील उत्सुकता आहे की, इंदुरीकर महाराज यांचं नेमकं उत्पन्न किती आहे, ते वर्षाला किती रुपये कमवतात? आज आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायलर होत आहे. या व्हिडीओमधून करण्यात आलेल्या दाव्यानुसार महाराजांचं वार्षिक उत्पन्न हे जवळपास सात कोटींच्या घरामध्ये आहे. तसेच महाराजांच्या एका किर्तनाचं मानधन जवळपास पन्नास हजारांच्या आसपास असल्याची माहिती देखील समोर आली आहे. इंदुरीकर महाराज हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध किर्तनकार असून, अधात्माच्या माध्यमातून ते समाजप्रबोधन करातात. त्यांच्या किर्तनांना राज्यभरातून मोठी मागणी असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं त्यांच्यावर टीका सुरू असल्यामुळे महाराजांनी यावर संताप व्यक्त केला आहे. राजकारण्यांच्या तीस मिनिटांच्या सभेसाठी तीन कोटी खर्च होतो, त्यावर कोणी कधी प्रश्न उपस्थित करतं का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
