AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! ‘पोटगी नाहीच, करुणा शर्मा पत्नीही नाहीत’… निकालात काय म्हटलं? नवी माहिती समोर

धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. या प्रकरणात आता मुंडे यांच्या वकिलानं मोठा खुलासा केला आहे.

सर्वात मोठी बातमी ! 'पोटगी नाहीच, करुणा शर्मा पत्नीही नाहीत'... निकालात काय म्हटलं? नवी माहिती समोर
| Updated on: Feb 06, 2025 | 5:47 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, वांद्रे कौटुंबीक न्यायालयाने धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये द्यावेत असे आदेश दिले आहेत. आपण धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करुणा शर्मा यांनी केला होता. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा आदेश दिला आहे. त्यानंतर आता न्यायालयात झालेला युक्तिवाद आणि न्यायालयाचा निकाल याबाबत धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले वकील?  

4 फेब्रुवारी रोजी हा अंतरिम निकाल आलेला आहे. युक्तिवाद गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये झाला होता. करुणा शर्मा नावाच्या महिलेनं धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध पिटीशन दाखल केलेली आहे. डोमेस्टिक व्हायलंस प्रमाणे ही याचिका दाखल करण्यात आली आहे. नियम असा आहे की, कुठलीही महिला कुठल्याही पुरुषाबरोबर राहिली असेल तर ती भविष्यात किंवा भूतकाळात आपल्या उदरनिर्वाहासाठी मेंटेनस पिटीशन दाखल करू शकते.

2022 मध्ये करुणा शर्मा यांनी मुंडे यांच्या विरोधामध्ये त्यांच्याकडे पैसे नाहीयेत, घर व बँकेचे ईएमआय भरण्यासाठी पैसे नाहीत असे वेगवेगळे आरोप करून पिटीशन दाखल केली होती.  मात्र यात शारिरीक छळ केल्याचा कुठलाही आरोप लावलेला नव्हता. धनंजय मुंडे माझ्याबरोबर राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांनी मला पैसे द्यावे अशी ती पिटीशन होती. त्यांच्या केसमध्ये युक्तिवाद झाल्यानंतर अंतरिम आदेश म्हणजे जोपर्यंत केस संपत नाही तोपर्यंत उदरनिर्वाहसाठी किती पैसे द्यावे यावरून युक्तिवाद झाला. या प्रकरणात कोर्टानं असं सांगितल की करुणा शर्मा यांना दर महिन्याला दोन लाख रुपये देण्यास हरकत नसावी.  लिव्ह इन रिलेशनशिप मान्य केल्यानं हे आदेश देण्यात आले आहेत, त्याला आपण पोटगी म्हणू शकत नाही, असं वकिलांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना शार्दुल सिंग यांनी म्हटलं की, करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांच्या पत्नीचा दर्जा कुठल्याही कोर्टाने दिला नाही, त्या पहिल्या पत्नी ऑन रेकॉर्ड कुठेच नाहीत,  त्यांच्याबरोबर कधी लग्नही झालेलं नाही. हायकोर्टात जो खटला धनंजय मुंडे ययांच्यावर दाखल केला होता त्या खटल्यासह इतर खटल्यात त्यांनी कुठेच असा क्लेम केलेला नाही.  25 पानाची कोर्टाची ऑर्डर आहे कुठल्याच लाईन मध्ये कोर्टाने पत्नी हा शब्द वापरला नाही वापरला असेल तर त्यांनी दाखवावा, कोर्टाने देखील असं काही सांगितलं नाही.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...