कोर्टाचा एक सवाल आणि सरकारी वकील गोंधळले, नेमकं काय घडलं, वाचा..
माणिकराव कोकाटे यांचा जामीन मंजूर झाला. हायकोर्टात सुनावणी पार पडली. माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही प्रकरणे आज ऐकली जाणार नाही असे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले होते.

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव कोकाटे यांना 1995 च्या गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी नाशिक न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यासंदर्भातील सुनावणी आज मुंबईतील हायकोर्टात पार पडली. अटकेपासून माणिकराव कोकाटे यांना दिलासा मिळाला. माणिकराव कोकाटे यांच्यावर सध्या लीलावती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आजच्या सुनावणीमध्ये मोठे युक्तीवाद झाले. सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलांनी आपली बाजू कोर्टात मांडली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तीवाद झाला. माणिकराव कोकाटे यांच्या या प्रकरणाकडे राज्याच्या नजरा होत्या. अखेर आजच्या सुनावणीनंतर कोकाटे यांचा जामीन मंजूर झाला. कोकाटे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या आमदारकीवरही टांगती तलवार आहे.
कोर्टात सुनावणीदरम्यान मोठा गोंधळ सरकारी वकिलांचा उडल्याचे बघायला मिळाले. कोर्टाने सुनावणीदरम्यान विचारले की, त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे का? आणि तो स्वीकारण्यात आलेला आहे का ?. यावर अनिकेत निकम यांनी म्हटले की, काल राजीनामा दिला आहे. कोकाटे किती वर्षापासून आमदार आहेत, कोर्टाची पुन्हा विचारणा केली. यावर बोलताना वकिलाने उत्तर दिले की, 1999 पासून
माणिकराव कोकाटे यांच्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही प्रकरणे आज ऐकली जाणार नाही असे कोर्टाकडून जाहीर करण्यात आले होते. याचिकेला विरोध की नाही याबाबत सरकारी वकिलांचा गोंधळ बघायला मिळाला. कोर्टात बाजू मांडताना सरकारी वकील म्हणतायत की मला फक्त फॅक्ट कोर्टासमोर मांडण्यास सांगितले आहे. तुमची नेमकी भूमिका काय आहे कोर्टाने पुन्हा पुन्हा त्यांना विचारले.
सरकारी वकिलांना थेटपणे कोर्टासमोर उत्तर देता आले नाही, त्यामुळे एकच गोंधळ उडाला. शेवटी सरकारी वकिलांनी याचिकेला विरोध करतोय असे सांगितले. यामुळे काही काळ कोर्टात गोंधळाचे वातावरण बघायला मिळाले. माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद गेले असून आता आमदारकी वाचणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 1995 चा गृहनिर्माण घोटाळा माणिकराव कोकाटे यांच्या चांगलाच अंगलट आल्याचे बघायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांचे खाते बदल करण्यात आले.
