AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vilas Ghule : विलास घुलेंची हत्या झाली त्या दिवशी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा कुठे होता? पहिल्यांदाच लोकेश समोर

बीडच्या केजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, दोन गटाच्या भांडणांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या विलास घुले यांचीच हत्या करण्यात आली, या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सैरभ सोनवणे याच्यावरही आरोप करण्यात आला आहे.

Vilas Ghule : विलास घुलेंची हत्या झाली त्या दिवशी खासदार बजरंग सोनवणेंचा मुलगा कुठे होता? पहिल्यांदाच लोकेश समोर
Saurabh SonawaneImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 24, 2026 | 3:24 PM
Share

बीडच्या केजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे, या घटनेनं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये दोन गटात भांडणाला सुरुवात झाली, या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या हॉटेलचे मालक विलास घुले यांच्यावरच धारदार शस्त्राने वार करण्यात आले, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान विलास घुले यांच्या हत्येमुळे जिल्ह्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. या घटनेत आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलावर आरोप करण्यात आला आहे. सौरभ बजरंग सोनवणे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मृत विलास घुले यांच्या नातेवाईकांनी केली आहे. दरम्यान आरोपींना पकडलं जात नसल्यानं विलास घुले यांचे नातेवाईक चांगले आक्रमक झाले होते. विलास घुलेचा मृतदेह तब्बल 11 तास केज पोलीस ठाण्यासमोर ठेवण्यात आला होता, अखेर जबाबात सैरभ सोनवणे याच्या नावाचा उल्लेख पोलिसांनी केल्यानंतर विलास घुले यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान सैरभ सोनवणे याच्यावर आरोप झाल्यानंतर पहिल्यांदाच त्याची या प्रकरणावर प्रतिक्रिया समोर आली आहे, त्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत, या प्रकरणावर बोलताना त्याने मोठा खुलासा केला आहे. विलास घुले यांची हत्या झाली, ही घडलेली घटना चुकीची आहे. आरोपींवर कारवाई झाली पाहिजे. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी दुपारपर्यंत येडेश्वरी कारखान्यावर होतो. दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत मी घरीच होतो. पोलिसांनी सगळे सीसीटीव्ही तपासले आहेत. माझी गाडी देखील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घरीच असल्याचे दिसत आहे, असं सैरव सोनवणे याने म्हटलं आहे.

दरम्यान राजकीय द्वेषातून माझ्यावरती हे आरोप केले जात आहेत. खासदारांच्या पाठीमागे मी कार्यकर्त्यांच्या सुख दुःखाच्या कार्यक्रमात सभागी असतो, ते कोणाला बघवत नाही का? असाही आम्हाला प्रश्न पडतोय. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. जे काही आहे ते सत्य समोर आलं पाहिजे. ज्या कुठल्या चौकशीसाठी सामोरं जावं लागेल त्यासाठी मी जायला तयार आहे. माझा त्यांचा संपर्क नाही, पोलिसांनी सीडीआर तपासला आहे, त्यामध्ये त्यांना स्पष्ट झाले आहे‌. पोलीस प्रशासन जे काही सत्य आहे ते समोर आणेल, असंही यावेळी सैरव सोनवणे याने म्हटलं आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा