छत्रपती संभाजी महाराज कोण होते? संभाजी ब्रिगेडचे मनोज आकरे म्हणतात, हे आम्ही सिद्ध करू

| Updated on: Jan 02, 2023 | 8:10 PM

राज्यात हेतुपुरस्पर षडयंत्र रचण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते हे आम्ही सिद्ध करू, असंही मनोज आकरे म्हणाले.

छत्रपती संभाजी महाराज कोण होते? संभाजी ब्रिगेडचे मनोज आकरे म्हणतात, हे आम्ही सिद्ध करू
मनोज आकरे
Follow us on

हिंगोली : छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्षेपार्ह विधान केलं. त्यावर भाजप राज्यात आक्रमक झाली आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आकरे म्हणाले, भारतीय संस्कृतीचे संरक्षण म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडं बघतो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं. तो धार्मिक नव्हे तर स्वातंत्र्य लढा होता. सर्व जाती-जमातीचे लोक या स्वातंत्र्यलढ्यात एकत्र आले. त्यातून स्वराज्य निर्माण झालं. स्वराज्याची निष्ठा ठेवून छत्रपती संभाजी महाराज यांनी लढाया केल्या. त्यामुळं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज म्हणणं काही वावगं नाही. स्वराज्यरक्षण हेचं छत्रपती संभाजी महाराज यांचं धर्मरक्षण होतं.

राज्यात महापुरुषांचा अपमान केला जात आहे. महापुरुषांचा अपमान महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. कारण या महापुरुषांची देणं या महाराष्ट्राला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषांचा अपमान वेळोवेळी केला जात आहे.

आता काही लोकं स्वराज्यरक्षण की, धर्मवीर या वादात समोर आलेत. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी होत होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची बदनामी केली जात होती. त्यावेळी या महाराष्ट्रात काय चाललं ते सुचलं नाही का, असा सवालही मनोज आकरे यांनी विचारला.

भाजप, आरएसएसची बांडगुळं जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, चंद्रकांत पाटील हे महापुरुषांची बदनामी करत होते तेव्हा कुठं होते, असा प्रश्नही त्यांनी विचारला. महाराष्ट्र यापुढं शांत बसणार नाही. राज्यात हेतुपुरस्पर षडयंत्र रचण्यात आलं. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते हे आम्ही सिद्ध करू, असंही मनोज आकरे म्हणाले.