कोण होणार अहमदनगरचा महापौर? आज निवडणूक

कोण होणार अहमदनगरचा महापौर? आज निवडणूक

अहमदनगर : अहमदनगरला थोड्याच वेळात महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडणार आहे. मात्र त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाल्याने सध्या महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी सर्वच पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमत सिद्ध करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर सर्वाधिक जागा असलेल्या शिवसेनेकडून […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:46 PM

अहमदनगर : अहमदनगरला थोड्याच वेळात महापौर आणि उपमहापौर निवडणूक पार पडणार आहे. मात्र त्रिशंकू परिस्थितीत निर्माण झाल्याने सध्या महापौर पदावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी सर्वच पक्षाने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणता पक्ष बहुमत सिद्ध करणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तर सर्वाधिक जागा असलेल्या शिवसेनेकडून प्रभाग क्रमांक 12-अ मधील  माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी महापौर पदाचा अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी  प्रभाग क्रमांक 13 अ मधील माजी गटनेते गणेश उर्फ उमेश कवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय.

त्याचबरोबर, 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपकडून प्रभाग क्रमांक 6 ब मधील माजी सभापती बाबासाहेब वाकळे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय. तर उपमहापौर पदासाठी प्रभाग क्रमांक 9 ब मधून भाजपच्या मालन ढोणे यांनी अर्ज दाखल केलाय. तर दुसऱ्या क्रमांकावर 18 जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादी प्रभाग क्रमांक 1 ड मधील कडून संपत बारस्कर यांनी अर्ज दाखल केलाय. तर काँग्रेसकडून प्रभाग क्रमांक 2 ब मधून रुपाली वारे या उपमहापौर पदासाठी उभ्या आहेत.

महानगरपालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने मोठा पेच निर्माण झालाय. सत्तेसाठी 35 नगरसेवकांच संख्याबळ असणं आवश्यक आहे. भाजप नगरसेवकांची संख्या फक्त 14 असताना भाजपकडून महापौर आणि उपमहापौर पदासाठी दावा केला जातोय. 35 ही मॅजिक फिगर भाजप कशी जमवणार हे जरी गुलदस्त्यात असलं तरी सत्ता स्थापनेचा दावा भाजपने केला आहे. आता दावा कितपत सार्थ ठरतो हे अवघ्या काही तासातच कळणार आहे.

अहमदनगर महापालिका निवडणूक अंतिम निकाल 2018 :

  • शिवसेना – 24
  • राष्ट्रवादी -18
  • भाजप -14
  • काँग्रेस – 5
  • बसपा – 04
  • समाजवादी पक्ष – 01
  • अपक्ष 2
  • एकूण – 68

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें