AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना कोणाची? गेम फिरणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट, आता थेट निवडणूक आयोगालाच…

मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत.

शिवसेना कोणाची? गेम फिरणार? कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादामुळे प्रकरणात मोठं ट्विस्ट, आता थेट निवडणूक आयोगालाच...
शिवसेनेच्या चिन्हावर सुप्रीम कोर्टात सुनावणी Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 4:05 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, आज पुन्हा एकदा शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणाचं? यावर सुप्रीम कोर्टात युक्तिवाद सुरू झाला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. दरम्यान आज पुन्हा एकदा कपिल सिब्बल यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का? असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांंनी उपस्थित केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची निवड ही लोकशाही पद्धतीने झाली आहे, आमची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीने निवडण्यात आली असा दावा देखील या सुनावणीवेळी कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आला आहे.

काय आहे कपिल सिब्बल यांचा नेमका दावा?  

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली होती. अनेक आमदारांनी त्यावेळी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांना समर्थन दिलं. शिवसेना पक्षात दोन गट पडले एक म्हणजे शिवसेना ठाकरे गट आणि दुसरा शिवसेना शिंदे गट, दरम्यान त्यानंतर शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव कोणत्या गटाचं असा प्रश्न निर्माण झाला, त्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचं चिन्ह आणि नाव शिवसेना शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतला. याच प्रकरणावर आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून आज सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हे बाजू मांडत आहेत, यावेळी सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. त्यांनी यावेळी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

1999 च्या घटनेमध्ये पक्षप्रमुखपद नव्हत, हे यांना 2026 ला कळालं का? असा सवाल यावेळी कपिल सिब्बल यांंनी उपस्थित केला आहे. तसेच शिवसेना पक्षात संघटना ही अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या पक्षाची रचना पूर्णत: संवैधानिक आहे.  फूट पडली ती फक्त विधिमंडळ पक्षात पडली, राजकीय पक्षात नाही, असा दावाही यावेळी कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच विधिमंडळ पक्ष कसा काय विकला जाऊ शकतो? असा सवालही  त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...