
देशातील सर्वात अवघड आणि उमेदवारांचा कस पाहणाऱ्या युपीएससीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने ( युपीएससी ) घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या निकालात यंदा मराठी टक्का घसरला आहे. या परीक्षेत आदित्य श्रीवास्तव याने पहिला क्रमांक तर अनिमेष प्रधान याने दुसरा आणि अनन्या रेड्डी हिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. महाराष्ट्रातील अनेक उमेदवारांनी यश मिळविले असले पहिल्या दहामध्ये एकही महाराष्ट्राचा विद्यार्थी नाही तर तरी पहिल्या शंभर विद्यार्थ्यात देखील मराठी उमेदवारांची संख्या थोडी कमी झाली आहे. दरवर्षी पहिल्या शंभर उमेदवारात महाराष्ट्रातील 10 ते 12 उमेदवारांचा समावेश असतो. यंदा केवळ पाच ते सहा उमेदवारांनाचा पहिल्या शंभरांत स्थान मिळविता आले आहे. यंदाच्या युपीएससी परीक्षांत मराठी मुलांचा टक्का का घसरला याचा घेतलेला धांडोळा…. आयएएस बनण्याचे ध्येय बाळगुन दरवर्षी देशभरातील सुमारे नऊ ते दहा लाख लोक परीक्षेला बसतात. परंतू त्यातील केवळ एक हजार मुलांची निवड...