Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का दिलं नाही? समोर आलं मोठ कारण

सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, त्यानंतर त्यांना तीन खात्याची जबाबदारी देखील देण्यात आली, मात्र अर्थ खातं सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेलं नाही, या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे.

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का दिलं नाही? समोर आलं मोठ कारण
सुनेत्रा पवार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 31, 2026 | 8:22 PM

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये अजित पवार यांचं निधन झालं, दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर आता राष्ट्रवादीचा गट नेता कोण होणार? नवा उपमुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं, अखेर आज सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, तसेच त्यांची विधिमंडळाच्या गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच समोर आलेल्या माहितीनुसार त्यांना तीन महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे, त्यामध्ये क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक मंत्रालयाचा समावेश आहे, मात्र सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं देण्यात आलेलं नाहीये. सुनेत्रा पवार यांंच्याकडे अर्थमंत्रालयाची जबाबदारी का देण्यात आली नाही? या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांना अर्थ खातं का मिळालं नाही?

सुनेत्रा पवार यांच्याकडे प्रशासकीय अनुभव नाही,  राज्याचा अर्थसंकल्प लगेचच 6 मार्च रोजी मांडला जाणार आहे, अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर असताना तसेच अनुभव नसताना अर्थखात्याची जबाबदारी सोपावणं हे जिकिरचं आहे.  अजित पवार यांनी बजेटची तयारी जवळपास पूर्ण केली होती, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र बजेटचा शेवटचा आढावा घेताना त्यात काही अचानक बदल सुचवायचे झाले तर ते अडचणीचं ठरलं असतं, त्यामुळे राष्ट्रवादीसोबत समन्वय राखत हे खातं मुख्यमंत्र्यांकडेच ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान अर्थसंकल्पानंतर पुन्हा अर्थ व नियोजन खातं हे राष्ट्रवादीलाच दिलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान अशी माहिती देखील समोर येत आहे की अर्थखात्याबाबत अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.  20 दिवसांवर अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्याने तुर्तास ते खाते देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च सांभाळावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादीतून आला आणि समन्वयाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.  अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीस यांनीच मांडावा, असं ठरलं असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्यावर अर्थखात्याबाबत निर्णय हेईल असा निर्णय बैठकीमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.