Ajit Pawar : युती झाली मग, सुप्रिया सुळे प्रचारात का नाही दिसल्या? त्या प्रश्नावर अजितदादा पहिल्यांदाच काय म्हणाले?

Ajit Pawar : "लोकांना काय वाटतं माहीत नाही. ते त्या अँगलने का विचार करतात ते माहीत नाही. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही युती करतोय. कोल्हापुरात आधी युती झाली होती. जेव्हाही चर्चा केल्यावर कुणाला तरी बरोबर घेतलं पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सूर जुळले पाहिजेत" असं अजित पवार म्हणाले.

Ajit Pawar : युती झाली मग, सुप्रिया सुळे प्रचारात का नाही दिसल्या? त्या प्रश्नावर अजितदादा पहिल्यांदाच काय म्हणाले?
Ajit Pawar TV 9 Marathi Interview
| Updated on: Jan 08, 2026 | 10:15 PM

नगरपरिषद निवडणुकांनंतर राज्यात 29 महानगर पालिकांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत आपणच नंबर 1 चा पक्ष आहोत हे सिद्ध करण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. वेगवेगळ्या पक्षांमधून अजूनही भाजपमध्ये इनकमिंग सुरु आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं तीन पक्षांचं मिळून महायुतीचं सरकार आहे. त्यात भाजपने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत मुंबई पालिसेसाठी युती केली आहे. त्याचवेळी भाजपने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत महत्वाच्या महापालिकेत युती केलेली नाही. भाजपसाठी मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडची महापालिका महत्वाची आहे. मुंबईत ज्या प्रमाणे त्यांनी एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलं, तसच ते पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या बाबतीत निर्णय घेऊ शकले असते. अजित पवारांची आज टीव्ही 9 मराठीच्या प्रसिद्ध पत्रकार निखिला म्हात्रे यांनी मुलाखत घेतली.

पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांना मानणाराही मोठा वर्ग आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत ते दिसून आलं. त्यांचे 10 नगराध्यक्ष पुणे जिल्ह्यातून निवडून आले. दुसरीकडे भाजपनेही पुण्यात उत्तम पकड बसवली आहे. 2017 च्या महानगरपालिका निवडणुकीत या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. त्यामुळे अजित पवारांना मुख्य स्पर्धक मानत त्यांनी युती टाळली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड हा अजित पवारांचा गड मानला जातो. त्यामुळे अजित पवारांनी आपलं सर्वाधिक लक्ष या दोन महापालिकांवर केंद्रीत केलं आहे.

प्रचारात सुप्रिया सुळे कधी दिसणार?

अजित पवार आणि त्यांचे काका शरद पवार यांचे मार्ग वेगळे झाल्यापासून राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसची शक्ती विभागली गेली. आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवतायत. पण सुप्रिया सुळे अजून प्रचारात सक्रीय दिसलेल्या नाहीत. यावर अजित पवारांना टीव्ही 9 मराठीने मुलाखतीत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी प्रचाराला येणार असं अनेकांनी सांगितलं आहे. अमोल कोल्हे, निलेश लंके, सुप्रिया सुळेंनी प्रचारात येणार म्हणून सांगितलं आहे. ते सभा देतील असं उत्तर दिलं.