Mumbai Mayor : मुंबईचा महापौर शिंदेंचाच? नवा फॉर्म्यूला तयार; सगळे नगरसेवक…राजधानीत घडामोडींना वेग!

मुंबई महानगर पालिका निवडणूकीत २५ वर्षांनंतर भाजपाचे महापौर होण्याची संधी आली आहे. गेल्या २५ वर्षे मुंबई महानगर पालिकेवर सलग शिवसेनेचे ( अविभक्त ) महापौर होत आले आहेत.

Mumbai Mayor : मुंबईचा महापौर शिंदेंचाच? नवा फॉर्म्यूला तयार; सगळे नगरसेवक...राजधानीत घडामोडींना वेग!
devendra fadnavis and eknath shinde
| Updated on: Jan 17, 2026 | 4:17 PM

महाराष्ट्रातील २९ महानगर पालिका निवडणूक निकाल समोर आले आहेत. या निवडणूकीत भाजपाने चांगली कामगिरी केली आहे. सर्वांचे लक्ष मुंबई महानगर पालिकेत भाजपाची सत्ता येणार का ? याकडे लागले होते. भाजपाच्या रणनितीला यश येत उद्धव ठाकरे यांची २५ वर्षांची पालिकेची सत्ता नष्ट झाली. आता मुंबईचा महापौर कोणाला करायचे यावर भाजपाची रणनिती सुरु आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे भाजपाची मुंबईत सत्ता येणे शक्य झाल्याने शिंदे यांनी बार्गेनिंग पॉवर चांगलीच वाढली आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या २२७ जागांपैकी महायुतीने ११८ जागा जिंकल्या आहेत. भाजपा ८९ जागांवर विजय मिळवल सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाने २९ जागा जिंकल्या आहेत. २५ वर्षांनंतर ऐतिहासिक मुंबई महानगर पालिकेवर भाजपाचा महापौर विराजमान होणार आहे. मुंबईचा महापौर हिंदू मराठी असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. शिंदे आणि भाजपा यांच्या अडीच वर्षे महापौर पद वाटून घेण्याचा प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी ठेवला आहे. परंतू यावर भाजपाकडून अजून संमती मिळालेली नाही. महापौर निवड लॉटरी पद्धतीने चिट्टी टाकून केली जाणार आहे.

Live

Municipal Election 2026

04:41 PM

Mumbai Municipal Election Results 2026 : मुंबई महापाैर आमचा व्हावा ही आमची इच्छा...

04:34 PM

Maharashtra Municipal Election Results 2026 : राज ठाकरे यांच्याबद्दल स्पष्ट बोलले देवेंद्र फडणवीस...

04:02 PM

AIMIM BMC Election 2026 : BMC मध्ये भाजपला सपोर्ट करणार की उद्धव ठाकरेंना? असदुद्दीन ओवैसींनी काय उत्तर दिलं?

03:18 PM

Mumbai Election Result 2026 : संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं - प्रवीण दरेकर

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

मुंबईत ८९ जागा मिळवणारी भाजपा मुंबईत आपला महापौर असावा यासाठी आग्रही आहे. या संदर्भात भाजपात विचारमंथन सुरु आहे. आता लॉटरीची वाट पाहिली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते देखील महापौर पदासाठी आपला दावा करत आहेत. अडीच-अडीच वर्षे महापौर पद वाटून घ्यावे अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्या नेते आपल्या नेत्याकडे करीत आहेत.

शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते अडीच वर्षे शिवसेनेचा महापौर असावा अशी मागणी करत आहेत. मात्र, भाजपाचे श्रेष्ठी यासाठी तयार होतील की नाही हा प्रश्नच आहे. त्यामुळे आता यावरुन युतीच्या दोन्ही पक्षात पुन्हा नाराजी नाट्य घडण्याची शक्यता आहे.

लॉटरी सिस्टीमने महापौर पदाची निवड

महाराष्ट्राचे नगर विकास मंत्रालयाद्वारा बीएमसी आणि उर्वरित मनपाच्या महापौर पदाच्या निवडणूकीसाठी आरक्षणाची लॉटरी काढली जाणार आहे. ही लॉटरी पुढच्या आठवड्यात काढली जाणार आहे. यात बीएमसी आणि उर्वरित मनपातील महापौर निवडले जाणार आहेत. ते कोणत्या जातप्रवर्गातील असतील यांची ही लॉटरी असणार आहे. उदा. मुंबई महापौर पदासाठी जर जनरल कॅटेगरीची लॉटरी काढली तर ओपन कॅटगरीचा कोणी जिंकला तर ओपन कॅटगरीचा उमेदवार महापौर बनू शकतो. याच प्रकारे उर्वरित मनपाचे महापौर देखील निवडले जातील.

मुंबई महानगर पालिका निवडणूकीत २५ वर्षांनंतर भाजपाचे महापौर होण्याची संधी आली आहे. गेल्या २५ वर्षे मुंबई महानगर पालिकेवर सलग शिवसेनेचे ( अविभक्त ) महापौर होत आले आहेत.