AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांना टाळी देणे उद्धवना भारी पडले ? मुंबई हातातून निसटण्याची ही १० मोठी कारणे वाचा

हिंदी भाषेच्या सक्तीवर दोन्ही ठाकरे एकत्र जरी आले असले तरी मुंबई सारख्या कॉस्मोपोलिटीन शहरात केवळ मराठी मतदारांवर विसंबून राहणे ठाकरे बंधूंना महागात पडल्याचे म्हटले जात आहे.

राज ठाकरे यांना टाळी देणे उद्धवना भारी पडले ? मुंबई हातातून निसटण्याची ही १० मोठी कारणे वाचा
| Updated on: Jan 16, 2026 | 11:48 PM
Share

मुंबई महानगर पालिकेत उद्धव आणि राज ठाकरे भावांची युती काही खास कमाल करु शकली नाही. दोन्ही भावांचे एकत्र येणे उद्धव ठाकरे यांना सत्तेबाहेर घेऊन गेले आहे. उद्धव ठाकरे यांना ६७ तर राज ठाकरे यांना ६ जागा मिळाल्या आहेत.साल २०२६ चे मुंबई महानगर पालिकेची निवडणूक ठाकरे बंधूंच्या चुकीच्या निर्णयाचा परिपाक म्हणून लक्षात राहणार आहे. आशियातील सर्वात श्रीमंत नगरी मुंबईत आता मराठी मते काही खास प्रभाव दाखवणारी ठरली नाहीत.

1 – सिंगल बास्केट ब्लंडर

अशी इंग्रजीत एक म्हण आहे की सर्व अंडी एकाच टोपलीत ठेवू नये. त्याकडे दुर्लक्ष करीत राज आणि उद्धव ठाकरे यांनी त्यांची संपूर्ण मदार मराठी मतदारांवर केंद्रीत केली. ठाकरे बंधूंच्या या रणनितीमुळे मुंबई रहाणाऱ्या इतर समुदायांनी त्यांच्याशी फारकत घेतली.

2 – महानगरांचे वास्तव्याकडे दुर्लक्ष

मुंबई हे कॉस्मोपोलीटीन शहर आहे. येथे विविध भाषा आणि जातीचे लोक रहात आहेत. येथील मराठी मतदार जरी ३५ टक्के असून ते महत्वाचे आहेत. परंतू मराठी मतदारांमुळे बहुमताचा आकडा गाठता येत नाही हे स्पष्ट झाले. उर्वरित ६५ टक्के लोक मनसेच्या परप्रांतीय धोरणामुळे नाराज होते.

3 – उर्वरित मुंबईचे गणित

मुंबईत २२% उत्तर भारतीय, २०% मुस्लीम आणि १८ % गुजराती,मारवाडी आहेत. यांची संख्या मुंबईच्या विजयात महत्वाची होती. केवळ मराठी मतदानावर विसंबून राहील्याने नुकसानच झाले. राज ठाकरे यांच्याशी उद्धव यांनी समझोता केल्याने इतर सुमदाय नाराज झाले.

4-धर्मनिरपेक्ष कवच हरवले

काँग्रेस सोबत महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची प्रतिमा उदार झाली होती. विविध समुदायांना त्यांना पसंती दिली. परंतू राज ठाकरे यांच्याशी हातमिळवणी केल्याने उदारमतवादी प्रतिमेला धक्का बसून हिंदी आणि गैरमराठी लोकांना ही युती पसंत पडली नाही.

5 – लाऊडस्पीकरचा मुद्दा

राज ठाकरे यांनी मस्जिदवरील लाऊड स्पिकरच्या मुद्यावरुन रान पेटवले होते. त्यामुळे २० टक्के मुस्लीम मतदार नाराज झाले होते. साल २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत उद्धव ठाकरे यांचे समर्थन करणाऱ्या मुस्लीम मतदारांनी त्यांची राज यांच्याशी हातमिळवणी पसंद केली नाही.

6 – उत्तर आणि दक्षिण भारतीय

उत्तर आणि दक्षिण भारतीयांसोबत राज ठाकरे यांच्या वक्तव्यांमुळे या मतदारांनी दोघा बंधूपासून अंतर राखले.उत्तर भारतीय तर आधीच राजवर नाराज आहेत, त्यात भाजपाचे नेते के. अण्णामलई यांच्या वक्तव्याचा राज यांनी समाचार घेतला त्याला शिवीगाळ करणे दक्षिण भारतीयांना नाराज करुन गेले.

7 – मराठी अस्मिता विरुद्ध विकास

ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेचा मुद्दा निवडणूकीच्या प्रचारात वापरण्याचा प्रयत्न केले.तर महायुतीने विकासाच्या मुद्यांवर मते मागितली. मराठी मतदारांची तरुण पिढीला संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास माहिती असण्याचा काही प्रश्नच नव्हता. त्यामुळे लोकांनी मेट्रो- ३ सह इतर विकास कामांसाठी महायुतीला मते दिली.

8 – महाविकास आघाडीत फूट

२०२४ च्या विधानसभा निवडणूकात युबीटी, काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी अशा महाविकास आघाडीमुळे मुंबईत शिवसेनेला जास्त जागा मिळाल्या. परंतू राज यांच्या उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केल्याने परप्रांतीय मते राखण्यासाठी काँग्रेसने ठाकरे बंधूंऐवजी मुंबईत फारसा जनाधार नसलेल्या वंचितशी युती करणे पसंद केले.

9 – भाजपा विरोधी मतांची विभागणी

शिवसेना यूबीटी आणि एमएनएस एकत्र निवडणूक लढल्याने काँग्रेसने स्वंतत्र लढण्याचा प्रयत्न केल्याने तिरंगी आणि चौरंगी निवडणूका झाल्या. त्यामुळे उपनगरात विरोधी मतांची विभागणी झाली. याचा मोठा फायदा शिंदे यांची शिवसेना आणि भाजपाला झाला.

10 – एक आत्मघाती गोल

मुंबई सारख्या बहुरंगी आणि बहुढंगी शहरात मतांची बेरीज करण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी रक्ताच्या नात्याला महत्व देत कुटुंबातील वाद मिठवला असला तर या नादात मुंबईत बहुतांशी जनाधार ते हरवून बसले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...