AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर घडामोडींना वेग, सर्वात मोठी बातमी समोर

शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यात देखील घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? एकनाथ शिंदेंच्या नंदनवन बंगल्यावर घडामोडींना वेग, सर्वात मोठी बातमी समोर
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 8:03 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीमध्ये आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे खासदार लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारीच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाच्या 9 खासदारांपैकी केवळ 4 खासदारच प्रत्यक्ष उपस्थित होते. इतर 5 खासदार ऑनलाईन उपस्थित होते, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. मात्र आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे वेगळा गट स्थापन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. हे सर्व खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर देखील घडामोडींना वेग आला आहे. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर ही भेट होणार आहे. उद्धव ठाकरे यांचे खासदार हे वेगळा गट स्थापन करण्याची माहिती समोर येत आहे.  या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे.

तर दुसरीकडे मात्र संजय राऊत यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. सर्व खासदार हे आमच्यासोबतच आहेत, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील या वृत्ताचं खंडण केलं आहे. कालच्या बैठकीला आम्ही चार खासदार उपस्थित होतो. इतर सर्वजन ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे असं काहीही होणार नाहीये. दिल्लीला अनेकजण आपल्या कामासाठी जात असतात. प्रतापराव जाधव हे केंद्रीय मंत्री आहेत, त्यामुळे खासदार कामानिमित्त त्यांना भेटले असतील, असंही वाजे यांनी म्हटलं आहे. मात्र या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला चांगलंच उधाण आलं आहे.

Follow Us
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा...
बाळासाहेबांसह, आनंद दिघे सुद्धा गायब! शिंदेंच्या बॅनरवर अमित शहांचा भलामोठा फोटो पाहून राऊत संतापले