AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात त्रिशंकु परिस्थिती निर्माण होणार? काय सांगताय एक्झिट पोलचे आकडे

महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा जागांवर मतदान झाले. सर्व जागांवर सायंकाळी ६ वाजता मतदान संपले. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीचे सरकार बनताना दिसत आहे. मात्र, इलेक्टोरल एजच्या एक्झिट पोलने महाविकास आघाडी आघाडीसाठी दिलासादायक बातमी आणली आहे.

महाराष्ट्रात त्रिशंकु परिस्थिती निर्माण होणार? काय सांगताय एक्झिट पोलचे आकडे
| Updated on: Nov 20, 2024 | 8:37 PM
Share

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पूर्ण झालं आहे. मतदानानंतर आता वेगवेगळ्या संस्थेचे एक्झिट पोल समोर येऊ लागले आहेत. काही एक्झिट पोलमध्ये मोठी उलथापालथ होणार असल्याचे दिसत आहे. एक्झिट पोलमध्ये महायुती आणि महाविकासआघाडी दोघांमध्ये कांटे की टक्कर असणार आहे. त्यामुळे राज्यात कोणाचे सरकार स्थापन होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे. इलेक्टोरल एजनुसार, राज्यात महाविकास आघाडीला 150 जागा मिळू शकतात. तर भाजपसोबत महायुतीला 118 जागा मिळू शकतात. 20 जागा इतरांच्या खात्यात जात आहेत.

SAS एक्झिट पोल काय सांगतो?

  • आणखी एका एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाल्याचे दिसत आहे. SAS च्या मते, राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीला 127 ते 135 जागा मिळू शकतात. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीला 147-155 जागा मिळू शकतात. इतरांना 10-13 जागा मिळताना दिसत आहेत.
  • MATRIZE च्या एक्झिट पोलनुसार महायुती सरकार बनवू शकते. महायुतीला 150-170, MVA 110-130 आणि इतरांना 8-10 जागा मिळण्याची शक्यता आहे.
  • चाणक्य रणनीतीनुसार, महायुतीला महाराष्ट्रात 152 ते 160 जागा मिळू शकतात आणि एमव्हीए आघाडीला 130 ते 138 जागा मिळू शकतात. इतरांना 6 ते 8 जागा मिळण्याची शक्यता आहे.
  • पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला 150 ते 170 जागा मिळतील, एमव्हीए आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 8 ते 10 जागा मिळतील असा अंदाज आहे.
  • पी-मार्कच्या एक्झिट पोलनुसार महायुतीचेही सरकार स्थापन होऊ शकते. महायुतीला 137 ते 157 जागा मिळतील, एमव्हीए आघाडीला 126 ते 146 जागा मिळतील, तर इतरांना 2 ते 8 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
  • पीपल्स पल्स एक्झिट पोलनुसार, महायुतीला महाराष्ट्रात 150 ते 170 जागा मिळतील, MVA आघाडीला 110 ते 130 जागा मिळतील, तर इतरांना 08 ते 10 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.