AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर? शिवसेना शिंदे गटानं पत्ते उघडले, कार्यकर्त्यांसाठी शिंदेंचा निरोप काय?

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.

महापालिका निवडणूक युतीमध्ये की स्वबळावर? शिवसेना शिंदे गटानं पत्ते उघडले, कार्यकर्त्यांसाठी शिंदेंचा निरोप काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 13, 2025 | 8:00 PM
Share

पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. मात्र या निवडणुका युती म्हणून लढवल्या जाणार की स्वबळाची चाचपणी होणार? याबाबत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नाशिक महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी मोठी घोषणा केली आहे, नाशिक महानगरपालिका निवडणूक शिवसेना युतीमध्येच लढणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ते शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले उदय सामंत? 

नाशिक महानगरपालिका निवडणूक शिवसेना युतीमध्येच लढणार आहे,  शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन मी तुमच्यापर्यंत आलो आहे. निवडणुकीचा सर्व निर्णय मंत्री दादा भुसे हे घेतील, त्यामुळे इतर कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचना यावेळी उदय सामंत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, नाशिक महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार. तुम्ही जी कामं केली आहेत, ती लोकांना घरोघरी जाऊन सांगा, कोणी काहीही घोषणा करू द्या त्यावर तुम्ही प्रतिक्रिया देऊ नका, असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिका जिंकण्याचा निर्धार महायुतीकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता या सर्व पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत.

दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटासंदर्भात देखील मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप वगळता इतर कोणत्याही पक्षासोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी युती करण्याची पक्षाची तयारी असल्याची माहिती समोर येत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय देखील युतीसाठी खुला असणार आहे. मात्र अद्याप या निवडणुकीसंदर्भात युतीबाबत महाविकास आघाडीमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याची माहिती देखील समोर येत आहे.

– नाशिक महापालिकेत भाजपकडून 100 पारचा नारा… –  पदाधिकारी कार्यकर्त्यांना सूचना… –

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा