
शुक्रवारी राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले, महापालिका निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा भाजपची जबरदस्त लाट दिसून आली, भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 29 पैकी तब्बल 26 महापालिकांमध्ये भाजप आणि महायुतीची सत्ता आली आहे, हा विरोधी पक्षासांठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये देखील भाजप शिवसेना शिंदे गट युतीने शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या युतीला धोबीपछाड दिला. मुंबईमध्ये देखील भाजपला मोठं यश मिळालं असून, भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मुंबई महापालिकेत भाजपचे 89 उमेदवार विजयी झाले, तर शिवसेना शिंदे गटाचे 29 उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीला मुंबई महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं आहे.
तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाला मुंबई महापालिकेत 65 जागा मिळाल्या आहेत, आणि मनसेला 6 जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाच्या विजयी उमेदवारांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं, यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीने महाराष्ट्राच्या महापालिकेत चमत्कार घडवला
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...
Mumbai Election Result 2026 : संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं - प्रवीण दरेकर
Uddhav Thcakeray On Mumbai Election Result 2016 : पालिका निवडणुकीतील पक्षाच्या प्रदर्शनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
सर्व विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतो. आपला महापौर झाला पाहिजे हे तर स्वप्न आहेच. गद्दारी करून विजय मिळवला त्यांना मराठी माणूस, माफ करणार नाही. कारण तन धन मन, आपल्याकडे तन आणि मन आहे, आणि त्यांच्याकडे फक्त धन आहे. आपल्याकडे जी काही शक्ती आहे, त्या शक्तीच्या जोरावर आपण त्यांना घाम फोडलेला आहे. आता ही जी काही शक्ती एकवटलेली आहे, ती अशीच ठेवा. जेणे करून तुमच्या पुढच्या पिढ्यांना तुमचा अभिमान वाटेल की माझे आई बाबा असतील, दादा असेल ताई असेल हे माझ्या भवितव्यासाठी पैसे मिळत असतानाही विकले गेले नाहीत. हे सर्व यश पूर्णपणे तुमचं आहे. असेच सोबत रहा, लढाई संपलेली नाही, खरी लढाई आता सुरू झाली आहे. जीद्द कोणी विकत घेऊ शकत नाही, याच जिद्दीच्या जोरावर आपल्याला विजय मिळवायचा आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.