Civic Result: महाराष्ट्राच्या सर्व 29 महापालिकांच्या निकालांची माहिती, कोणत्या पक्षाची किती मजल, जाणून घ्या एका क्लिकवर
Maharashtra Municipal Corporation Election 2026: बीएमसी निवडणुकीत राज्यात मोठा उलटफेर झाला. तर महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेकांची गणितं विस्कटली. देशातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर होणार आहे. ठाकरे बंधुंच्या हातून बीएमसी निसटली आहे. ते 25 वर्षानंतर विरोधी बाकांवर दिसतील.

Maharashtra Municipal Corporation Election 2026: महाराष्ट्राच्या सर्व 29 महानगरपालिकांतील सत्ता बदलाचे चित्र समोर आले आहे. या निवडणकीत 23 महापालिकांमध्ये भाजपचा झंझावात दिसला. भाजपने महायुतीत महाविजय मिळवला. तर मुंबईत ठाकरेंची महानगरपालिकेवरील सत्तेला मोठा सुरूंग लागला. मनसेसोबतच्या युतीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काँग्रेसने लातूरची गढी राखली. तर दूर चंद्रपूरमध्ये भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने जोरदार आघाडी उघडली. 29 महापालिकांच्या निकालांची माहिती एका क्लिकवर जाणून घ्या.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
Municipal Election 2026
देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीने महाराष्ट्राच्या महापालिकेत चमत्कार घडवला
Maharashtra Election Results 2026 : अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चर्चा...
Mumbai Election Result 2026 : संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं - प्रवीण दरेकर
Uddhav Thcakeray On Mumbai Election Result 2016 : पालिका निवडणुकीतील पक्षाच्या प्रदर्शनावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक
सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निकालात मोठा उलटफेर झाला. महायुतीने येथे 112 जागा मिळवल्या. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपने 90 जागा मिळवल्या. तर शिंदेंची शिवसेना 22 जागांवर थांबली. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 65 तर मनसेला 8 जागा मिळाल्या. काँग्रेसला 24 जागा तर AIMIM ला 8 जागा मिळाल्या.
पुणे महानगरपालिका (PMC)
पुणे महानगरपालिका (PMC) निकाल समोर आले आहे. पवारांच्या बालेकिल्ल्याला भाजपने मोठा सुरुंग लावला. एकूण 165 जागांपैकी भाजपला 120 जागा तर तर शिंदेसेनेला इथं खातं उघडता आलं नाही. तर दोन्ही राष्ट्रवादीला एकत्रित 29 जागा मिळाल्या. काँग्रेस 15 ठिकाणी विजयी झाली. उद्धव सेनेला एका जागेवरच समाधान मानावं लागलं.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (PCMC)
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील (PCMC)एकूण 128 जागांपैकी भाजपने 84 जागांवर विजय मिळवला. शिंदे सेनेला इथं 6 जागा, तर दोन्ही राष्ट्रवादी मिळून एकूण 37 जागा मिळवता आल्या. इतर पक्षांना इथं खातंही उघडता आलं नाही. एक जागा अपक्षाला मिळाली.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका
एकूण 122 जागा असलेल्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) निकालात भाजपला 50, शिंदेसेनेला 54, उद्धवसेनेला 10, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, मनसेला 5 तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. इतर पक्षांना इथं खातंही उघडता आलं नाही.
ठाणे महापालिका
एकूण 131 जागांच्या ठाणे महानगरपालिकेत (TMC) भाजप 28 जागा, तर एकनाथ शिंदे यांना 75 जागा मिळाल्या. उद्धवसेनेला दोन तर मनसेला अवघी एक जागा मिळाली. अपक्षाने एक जागा हिसकावली. इतर पक्षांना इथं भोपळा फोडता आला नाही.
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC)
नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) एकूण 111 जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत गणेश नाईकांच्या वक्तव्याने रंगत आणली होती. इथं भाजपला 65 जागा तर शिंदे सेनेला 42 जागांवर विजय मिळाला. तर उद्धवसेना दोन जागांवर आणि मनसे एका जागावर थांबली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला इथं खातं उघडता आलं नाही.
वसई-विरार महानगरपालिका (VVMC)
115 जागा असलेली वसई विरार महानगरपालिकेत हिंतेंद्र ठाकूर यांनी मोठी मुसंडी मारली. बहुजन विकास आघाड़ीने (BVA) 71 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर भाजपच्या पारड्यात 43 जागा पडल्या.तर शिंदेसेना, उद्धव सेना, दोन्ही राष्ट्रवादीला खातंही उघडता आलं नाही.
पनवेल महानगरपालिका
पनवेल महानगरपालिकेच्या (PMMC) निकालात भाजपचा दबदबा दिसून आला. एकूण 78 जागांपैकी 55 जागांवर भाजप विजयी झाली तर शिंदेसेना दोन ठिकाणी विजयी झाली. उद्धवसेनेला 5, काँग्रेसला 4 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्या.
मीरा-भाईंदर महानगरपालिका (MBMC)
मीरा-भाईंदर महानगरपालिकेत (MBMC) भाजपने मोठा विजय मिळवला. एकूण 95 जागांमध्ये 78 जागा भाजपला मिळाल्या. काँग्रेसला 13 तर शिंदेसेनेला 3 जागांवर समाधान मानावं लागलं. अपक्षाला एक जागा मिळाली. इतर पक्षाचं इथं काहीही चाललं नाही.
उल्हासनगर महानगरपालिका (UMC)
उल्हासनगर महानगरपालिकेत (UMC) महायुतीचं पारडं जड भरलं. इथं भाजपला 37 तर एकनाथ शिदे यांच्या शिवसेनेला 36 जागा मिळाल्या. एक जागा काँग्रेसला तर इतर पक्षांना तीन जागा मिळाल्या. मुख्य प्रवाहातील पक्षांना या ठिकाणी खातं उघडता आलं नहा.
भिवंडी-निजामपुर महानगरपालिका (BNMC)
भिवंडी-निजामपुर महानगरपालिका (BNMC) निकालात काँग्रेसने सर्वांना मोठा धक्का दिला. काँग्रेसला इथं 30 जागा मिळाल्या तर त्या खालोखाल भाजपला 22 तर शिंदे सेनेला 12 जागा मिळाल्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 12 जागांवर विजय मिळवता आला.
नाशिक महानगरपालिका (NMC)
एकूण 122 जागांपैकी इथं 72 जागांवर भाजपनं मुसंडी मारली. तर शिंदेसेनेला 26 जागा आणि उद्धव सेनेला 15, मनसेला एका जागेवर समाधान मानावं लागले. काँग्रेसला तीन जागा, तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार जागा इथं मिळाल्या.
जळगाव महानगरपालिका (JMC)
जळगाव महानगरपालिकेत (JMC) एकूण 75 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 46 जागा खिश्यात घातल्या. तर शिंदेसेनेला 22 जागा मिळाल्या. उद्धव सेना पाच तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली. खडसे असतानाही इथं शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला खातं उघडता आलं नाही.
मालेगाव महानगरपालिका
मालेगाव महानगरपालिकेत इस्लामिक पक्षाने मोठी मुसंडी मारली. इतरांसह या पक्षाने 40 जागा घेतल्या. एमआयएमला 21 जागा मिळाल्या. तर शिंदेसेनेला 18 जागा, भाजपला दोन, काँग्रेसला तीन जागा मिळाल्या.
कोल्हापुर महानगरपालिका
कोल्हापुर महानगरपालिकेत (KMC) काँग्रेसने हाबाडा दिला. पण सत्ता स्थापनेपासून हा पक्ष दूर दिसतो. एकूण 81 जागांपैकी काँग्रेसने 34 ठिकाणी विजय मिळवला. तर भाजपने 26, एकनाथ शिंदे सेनेला 15, उद्धव सेनेला एक, अजितदादांच्या राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.
सोलापुर महानगरपालिका
सोलापुर महानगरपालिका (SMC) निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवला. एकूण 102 जागांपैकी 87 जागा भाजपला मिळाल्या. तर शिंदेसेनेला चार जागा मिळाल्या. काँग्रेसला दोन, अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक तर एआयएमआयएमला आठ जागा मिळाल्या.
अमरावती महानगरपालिका
अमरावती महानगरपालिकेत (AMC) भाजपला त्याचा मित्र पक्ष युवा स्वाभिमानी चांगलाच नडला. एकूण 87 जागांपैकी भाजपला 25 तर युवा स्वाभिमानी आणि काँग्रेसला प्रत्येकी 15 जागा मिळाल्या. शिंदेसेनाला तीन तर उद्धव सेनेला दोन जागा मिळाल्या. अजितदादांच्या राष्ट्रवादीला 11 तर एमआयएमला 12 जागांवर विजय मिळाला.
जालना महानगरपालिकेत (JMC)
जालना महानगरपालिका (JMC) निवडणुकीत भाजपने तुफान बॅटिंग केली. एकूण 65 जागांपैकी भाजपने 41 जागा खिश्यात घातल्या. शिंदेंच्या शिवसेनेला 12 जागा मिळाल्या. तर काँग्रेसला 9 जागांवर विजय मिळाला. इतर पक्षांना इथं चमकदार कामगिरी करता आली नाही.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका (CSMC)
छत्रपति संभाजीनगर महानगरपालिकेत (CSMC) पहिल्यांदाच एका पक्षाच्या हाती जनतेने सत्ता दिली. भाजपने इथं 57 जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर शिंदेसेनेला 13 जागा मिळाल्या. उद्धवसेना अवघ्या 6 जागांवर तर काँग्रेस आणि अजितदादाची राष्ट्रवादी एका एका जागेवरच थांबली. त्यानंतर एमआयएमने करिष्मा दाखवला. एमआयएमला 33 जागा मिळाल्या.
लातूर आणि परभणी महापालिका
लातूर महापालिकेत काँग्रेसने गढी राखली. इथं काँग्रेसने भाजपला चांगलीच धोबीपछाड दिली. काँग्रेसला सर्वाधिक 43 जागांवर विजय मिळाला. तर भाजपला 22 जागांवर समाधान मानावं लागलं. वंचितला 4 जागा तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. तर परभणीत उद्धवसेनेने 25 जागांवर मुसंडी मारली. काँग्रेसला 12 तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला 11 जागा मिळाल्या.
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका (SMKMC)
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका (SMKMC) निकालात भाजपचा झंझावात दिसला. एकूण 78 जागांच्या महापालिकेत भाजपने 39 जागांसह दणदणीत विजय मिळवला. तर काँग्रेसला 18 जागा, अजित पवार NCP 16, शरद पवार NCP 3 तर शिंदेसेनेला अवघ्या 2 जागा मिळाल्या. तर इचलकरंजीमध्ये भाजपने मोठा विजय मिळवला. येथील 65 जागांपैकी भाजपने 43 जागा मिळवल्या. इतर पक्ष 17 शिंदेसेना ३, उद्धव सेनेला एक जागा मिळाली.
अहिल्यानगर महानगरपालिका (AMC)
एकूण 68 जागांपैकी अजित पवार यांची राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरली. इथं अजित पवार NCP ला 27 जागा मिळाल्या. तर त्यानंतर भाजपला 25 जागा तर एकनाथ शिंदे शिवसेनेला 10 जागा मिळाल्या. उद्धव सेना एक तर काँग्रेसला दोन जागांवर समाधान मानावं लागलं.
नागपुर महानगरपालिका (NMC)
नागपुर महानगरपालिकेच्या (NMC) एकूण 151 जागांपैकी भाजपने 102 अशी मोठी मुसंडी मारली. तर उद्धवसेनेला दोन आणि शिंदेसेनेला एक जागा मिळाली. काँग्रेसला इथं 34 जागा मिळाल्या. अजितदादांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळाली. इतर पक्षांना 11 जागा मिळाल्या.
चंद्रपूर महानगरपालिका
चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 66 जागांपैकी 23 जागा भाजपला तर सर्वाधिक 27 जागा काँग्रेसला मिळाल्या. उद्धवसेनेच्या खात्यात सहा जागा, तर शिंदेसेनेला एक जागा मिळाली. एमआयएमला एक जागा तर इतरांना 6 जागा मिळाल्या.
अकोला महापालिका
अकोला महापालिकेत भाजप मोठा भाऊ ठरला. इथं भाजपने 38 जागा मिळवल्या. तर काँग्रेसला 21 जागा मिळाल्या. उद्धवसेना सहा, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तीन तर अजितदादांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागेल.
नांदेड-वाघाळा महापालिका
नांदेड-वाघाळा महापालिकेत 81 पैकी 45 जागांवर भाजपनं दणदणीत विजय मिळवला. तर त्यापाठोपाठ एमआयएम 14, काँग्रेस 10, अजितदादांची राष्ट्रवादी दोन आणि इतरांना पाच जागा मिळाल्या.
