AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभवातही विजय… महाराष्ट्रातील काँग्रेसच्या विजयाने खरगे आणि राहुल गांधींना मेसेज काय?

Congress In Municipal Corporation Election 2026: गेल्या दशकातील काँग्रेसचे राजकारणातील पिछेहाट नजरेत भरणारी आहे. भाजपला 'राम' गवसला, तसा काँग्रेसला नव संजीवनी देणाऱ्या 'हनुमाना'ची प्रतिक्षा संपलेली नाही. राहुल गांधी नव्या दमाने प्रयत्न करत आहेत. पण यश मिळत नाही. महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या एक-दोन पत्रकार परिषद सोडल्यात तर हा पक्ष प्रचारात चमकला नाही. पण काँग्रेस सायलंट किलर मानल्या जात आहे.

पराभवातही विजय... महाराष्ट्रातील काँग्रेसच्या विजयाने खरगे आणि राहुल गांधींना मेसेज काय?
राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसImage Credit source: एएनआय
| Updated on: Jan 17, 2026 | 1:45 PM
Share

Congress In Municipal Corporation Election: गेल्या दशकभरात काँग्रेस रसातळाकडे जात आहे. बोटावर मोजण्यात इतकी राज्य सर्वात जुन्या पक्षाच्या हातात आहेत. तर अनेक संस्थांवर भाजपचे अधिक्रमण वेगाने होत आहे. लोकसभा वगळता काँग्रेसला विधानसभेत अतिआत्मविश्वास नडला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळाची खुमखुमी आणि आघाडीची चुकलेली गणितं, काँग्रेसला पुन्हा ‘वंचित’ करून गेली. राज्यात इतकी हाराकिरी सुरु असताना लातूरची गढी राखण्यात काँग्रेसला यश आले. तर कोल्हापूरच्या तालमीत पक्षाने अनेकांना चित्तपट करूनही सत्ता मिळेल याची शाश्वती नाही. विजय वडेट्टीवारांमुळे चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा सूर्य उगवला. तर भिवंडीत कदाचित काँग्रेस सत्तेतील वाटेकरी असेल. एकूणच अनेक ठिकाणी पराभवाच्या राखेतूनही विजयाचे धुमारे फुटले आहेत. त्यामुळे थोडी अधिक मेहनत घेतली, नियोजन केलं, अंतर्गत वादावर तोडगा काढला आणि पक्षाला शिस्त लावली तर दिल्ली दूर नही असाच संदेश मिळताना दिसतोय.

लातूरची गढी राखली

काँग्रेसने लातूरची गढी राखली. एकूण ७० जागा असलेल्या महापालिकेत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत ४३ जागांवर बाजी मारली. गेल्यावेळीपेक्षा काँग्रेसने अधिक जागा खिशात घातल्या. वंचितला ४ जागा मिळाल्या. या ठिकाणी भाजप २२ जागांवरच थांबली. तर शिंदेसेनेला भोपळा मिळाला. शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धवसेना, मनसेला भोपळा मिळाला. तर दादांचा एक उमेदवार निवडून आला.

परभणीत उद्धवसेनेसोबत काँग्रेसेच सत्ताकारण

परभणीत उद्धव सेना आणि काँग्रेसने मोठा खेला केला. एकूण ६५ जागांपैकी उद्धव सेनेला २५ तर काँग्रेसला १२ जागा मिळाल्या. परभणीकरांनी भाजपला १२ ठिकाणी रोखले. शिंदे सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खातं उघडता आलं नाही. जगात जर्मनी आणि भारतात परभणी, असे उगाच म्हणत नाही हे या शहरानं दाखवून दिलं.

चंद्रपूरमध्ये भाजपला काँग्रेसचा धक्का

चंद्रपूरमध्ये एकूण ६६ जागांपैकी काँग्रेसने २७ ठिकाणी मुसंडी मारत भाजपला मोठा धक्का दिला. याठिकाणी भाजप अंतर्गत कलहामुळे २३ जागांवरच आटोपली. विजय वडेट्टीवारांच्या गणितामुळे काँग्रेसने भाजपला अस्मान दाखवले. त्यामुळे भाजपला हरवणे अवघड नाही असेच संदेश दिल्लाला दिला.

अमरावतीत जोर कमी पडला

अमरावतीत भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षात राजकीय चुरशीचा काँग्रेसला फायदा घेता आला नाही. काँग्रेसला या ठिकाणी १५ जागा मिळाल्या. थोडा जोर लावला असता तर कदाचित काँग्रेसने येथे मोठा गेम पालटवला असता. युवा स्वाभिमानीला १५ आणि भाजपला इथं २५ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युवा स्वाभिमानी हा किंगमेकरच्या भूमिकेत आहे.

काँग्रेसचे पाच महापौर?

राज्यातील २९ महानगरपालिकांचे निकाल हाती आल्यानंतर ठाकरे ब्रँड, पवार काका-पुतणे यांच्या पाठोपाठ काँग्रेसच्या हाराकिरीची चर्चा रंगली. नव्या दमाचे विदर्भातील प्रदेशाध्य हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीत हरेएक प्रयोग करून पाहिला. मुंबईत स्वबळाचा नारा दिला. काही ठिकाणी वंचितसोबत आघाडी, तर इतर महापालिकांमध्ये वेगळा प्रयोग केला. तरीही पाहिजे तसे यश खेचून आणण्यात काँग्रेसला यश आले नाही. पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची चर्चेत पडता ही वैचारिक लढाई असल्याचा दावा प्रदेशाध्यक्षांनी केला.

सध्याची जी आकडेवारी आहे. त्यानुसार काँग्रेस अनेक महापालिकेत जसा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आला आहे. तसेच पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० नगरसेवक आणि १० ठिकाणी सत्तेत सभागी होऊ असे चित्र असल्याचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी स्पष्ट केले. अपयशाने खचून न जाता पुढच्या लढाईसाठी काँग्रेस सज्ज असल्याचा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी भाजपवर फिक्सिंगचा वापर केल्याचा आरोप केला.

मुंबईत काँग्रेसने २४ जागा मिळवल्या आहेत. मनसेच्या तुलनेत त्यांनी चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी गेल्यावेळी पेक्षा काँग्रेसला मोठी कामगिरी बजावता आलेली नाही. इतर काही महापालिकेत तर काँग्रेसला खातंही उघडता आलेले नाही. ठाणे, नवी मुंबई, धुळे, जळगाव, पिंपरी चिंचवड,इलचकरंजीत काँग्रेसला उमेदवार निवडून आणता आलेला नाही. गटातटातील काँग्रेस एकजूट होऊन जर कामाला लागली तर सत्तेचे गणित पालटू शकते हे या निकालावरून दिसून येते. या महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना जादा मेहनत घेतली. तर प्रचारावर फार काही जोर दिसला नाही. त्यामुळे काँग्रेसने अंग झाडून प्रयत्न केला तर मोठं यश या पक्षाच्या पदरात पडू शकते, हेच या पराभवातून शिकण्यासारखं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...