महिला सदस्याची आधी बिनविरोध निवड, निकालानंतर गायब, सरपंच निवडीच्या दिवशी हजर, ग्रामस्थांकडून मारहाण

| Updated on: Feb 08, 2021 | 6:42 PM

हिंगोलीत सरपंचपदाच्या निवडीच्या वेळेला दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे (Woman Gram Panchayat member beaten up by villagers in Hingoli)

महिला सदस्याची आधी बिनविरोध निवड, निकालानंतर गायब, सरपंच निवडीच्या दिवशी हजर, ग्रामस्थांकडून मारहाण
Follow us on

हिंगोली : सरपंचपदाच्या निवडीच्या वेळेला दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे. जी महिला बिनविरोध निवडून आली होती त्या महिलेला महिला ग्रामस्तानी मारहाण केली. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असताना महिला सदस्यला मारहाण करण्यात आली. सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे ही घटना घडली. संबंधित महिला सदस्याचं नाव सुमन सातकर असं आहे (Woman Gram Panchayat member beaten up by villagers in Hingoli).

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नुकतीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथे देखील ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण नऊ जण मैदानात होते. मात्र, यापैकी सुमन सातकर या महिला सदस्याला एका समाजाने भरघोस पाठिंबा दिल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे वायचाळ पिंपरी ग्रामपंचायतीत आठ सदस्यांमध्ये निवडणूक झाली. या निवडणुकीत दोन पॅनल आमनेसामने होते. या पैकी एका पॅनलची महिला सदस्य बिनविरोध निवडून आली होती. मात्र, निवडणुकीचा निकाल लागल्यापासून संबंधित महिला अचानक गायब झाली होती.

वायचाळ पिंपरी ग्रामपंचायतीचा निकालही विलक्षण आणि भयानक आला होता. दोन्ही पॅनलचे प्रत्येकी चार सदस्य निवडून आले होते. त्यापैकी एका पॅनलची महिला सदस्य ही अगोदरपासूनच बिनविरोध निवडून आली होती. मात्र, बिनविरोध निवडून आलेली महिला निकाल लागल्यापासून बेपत्ता होती. त्यामुळे तिच्या पॅनलमधील सदस्यांना समोरच्या पॅनलच्या सदस्यांवर शंका होती. संबंधित महिला समोरच्या पॅनलच्या सदस्यांसोबत सहलीला गेल्याचा अंदाज काही लोकांनी वर्तवला होता.

दरम्यान, वायचाळ पिंपरी ग्रामपंचायतीचा आज सरपंचपदाची निवड करण्यात येणार होती. यासाठी बिनविरोध निवडून आलेल्या महिला सदस्य सुमन सातकर या ग्रामपंचायतीत दाखल झाल्या. निवडणुकीच्या निकालापासून गायब झालेली महिला सदस्य अचानक सरपंचपदाच्या निवडीच्या वेळी दाखल झाल्याने गावकऱ्यांना धक्काच बसला. त्या महिलेला ज्या लोकांनी बिनविरोध निवडून आणलं होतं त्यापैकी काही महिला तिच्याजवळ गेल्या.

सुरुवातीला महिला सदस्य आणि गावकरी महिलांमध्ये शाब्दिक वाद झाला. या वादाचं रुपांतर बाचाबाचीत झालं. त्यानंतर महिला ग्रामस्थानी थेट महिला सदस्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस देखील घटनास्थळी दाखल होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने वाद शांत झाला. मात्र, परिसरात तणावाचं वातावरण होतं (Woman Gram Panchayat member beaten up by villagers in Hingoli).

हेही वाचा : VIDEO | औरंगाबदेत पोलीस-जमावामध्ये बाचाबाची, पोलिसांकडून अभद्र भाषेचा प्रयोग, पाहा व्हिडीओ