VIDEO | औरंगाबदेत पोलीस-जमावामध्ये बाचाबाची, पोलिसांकडून अभद्र भाषेचा प्रयोग, पाहा व्हिडीओ

आरोपीला ताब्यात घेण्याच्या कारणावरून काल रविवारी (7 फेब्रुवारी) मोठा जमाव औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयावर जमला होता. (Aurangabad Police and mob Clash viral video)

VIDEO | औरंगाबदेत पोलीस-जमावामध्ये बाचाबाची, पोलिसांकडून अभद्र भाषेचा प्रयोग, पाहा व्हिडीओ

औरंगाबाद : संशयित आरोपीला ताब्यात घेण्यावरून औरंगाबादेत पोलीस आणि जमावामध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोपीला ताब्यात घेण्याच्या कारणावरून काल रविवारी (7 फेब्रुवारी) मोठा जमाव औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयावर जमला होता. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये बाचाबाची झाली. बाचाबाचीचा हा व्हिडीओ  ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागला असून पोलीस आणि जमाव यांच्यात धक्काबुक्की झाल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे. एका व्हिडिओत पोलीस अभद्र भाषेचा वापर करत असल्याचाही प्रकार समोर आला आहे. (in Aurangabad Clash between Police and mob, video goes viral)

औरंगाबाद हे राज्यातील संवेदनशील शहर म्हणून ओळखले जाते. येथे दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचा घटना अनेकदा घडल्य़ा आहेत. मात्र, आरोपीला ताब्यात घेण्यावरून थेट पोलीस आणि जमावामध्ये वाद आणि धक्काबुक्की झाल्याचे येथे पहिल्यांदाच समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मोठा जमाव औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयावर जमला होता. यावेळी पोलीस आणि जमावामध्ये एका आरोपीला अटक करण्याच्या मुद्द्यावरुन चांगलीच बाचाबाची झाली.  तसेच यावेळी पोलीस आणि जमाव यांच्यात धक्काबुक्की झाल्याचीही माहिती समोर येत आहे. एका व्हिडिओत तर पोलिसांनी अपशब्द वापरल्याचेही दिसत आहे.

दरम्यान, पोलीस आयुक्त कार्यालयासमोर जमाव जमल्यामुळेच आरोपीला पळ काढण्यास संधी मिळाली, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे जमावतील काही जणांवर कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

पोलीस-जमाव यांच्यात वाद, पाहा व्हिडीओ

 

इतर बातम्या :

Video | ‘व्हॅलेंटाईन वीक’ मध्ये आलियाचा कहो ना प्यार है पॅटर्न, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल!

Video | कोच रिकामा, मग मराठी अभिनेत्रीचं छय्यां छय्यां, पहा व्हिडीओ !

Video | अंकिता लोखंडेचा ‘धक-धक करने लगा’ डान्स पाहिला का?; तुमचंही काळीज धक धक करेल!

(in Aurangabad Clash between Police and mob, video goes viral)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI