AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sikandar Shaikh : ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात, ‘थार’ची धडक..

पैलवान सिकंदर शेखच्या थार गाडीला कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडीजवळ रत्नागिरी-नागपूर हायवेवर अपघात झाला आहे. गाडीने डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. हायवे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत,

Sikandar Shaikh : 'महाराष्ट्र केसरी' पैलवान सिकंदर शेखच्या गाडीचा अपघात,  'थार'ची धडक..
सिकंदर शेख याच्या थार गाडीचा भीषण अपघात
| Updated on: Jun 10, 2026 | 1:31 PM
Share

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख याच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ त्याच्या ‘थार’गाडीचा अपघात झाला. रत्नागिरी नागपूर हायवे वर विठ्ठलवाडी येथे कारने साईड डिव्हायडरला धडक दिल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र अपघातावेळी गाडीत सिकंदर शेख होता की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या भीषण अपघातात कोणी जखमी झालं आहे की नाही अद्याप समजू शकलेलं नाहीये. हायवे पोलीसांकडून या अपघातासंदर्भात अधिक तपास करण्यात येत आहे.

सकाळी झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार,आज सकाळी साडेसहाच्या सुमारा रत्नागिरी-नागपूर महामार्गावर सिकंदर शेख याच्या थार गाडीचा अपघात झाला. कवठेमंकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी जवळ कार अपघातग्रस्त झाली. कार चालवणाऱ्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हाँ अपघात झाल्याचे समजते. नियंत्रण सुटल्याने थार कार ही साईड डिव्हायडरला धडकली. मात्र गाडी वेगात असल्याने ही जोरदार धडक बसली की कारच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला.

पोलिसांकडून तपास सुरू

थारच्या अपघाताची घटना घडली तेव्हा महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख किंवा अन्य कोणी व्यक्ती कारमध्ये होती की नाही, कोणी जखमी झाले आहे की नाही याची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही. जखमींबद्दल काही कळू शकेलं नाहीये. अपघाताची बातमी समजताच परिसरातील नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. पोलिसांना या घटनेची माहिती मुळतचा ते अपघातस्थळी दाखल झाले आणि त्यांनी पुढील तपास सुरू केला.

सिकंदर शेख हे महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय नाव आहे. गेल्या वर्षी सिकंदर शेख वादात सापडला होता. त्याला पंजाबमध्ये अटक झाली होती. सिकंदरला जाणीवपूर्वक गोवले जात असल्याचा त्याच्या वडिलांनी आरोप केला. मात्र त्यानंतर सिकंदर शेख याने जोरदार कमबॅक करत अनेक मैदानं मारली. त्यानंतर आता त्याच्या गाडीच्या अपघाताची माहिची समोर येत असून चाहत्यांना धक्का बसला आहे.त्याला दुखापत झाली नसावी, त्याची प्रकृती ठीक असावी अशी प्रार्थना चाहते करत आहेत.

Follow Us
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार
सर्वात मोठी अपडेट! खारातच्या जमिनीत पार्टनरशिप... चाकणकरांचा पलटवार, सगळ्यांना कोर्टात ओढलं
महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
Pune Mahapalika | महापौर कार्यालय उडवून देणार! पुण्यात धमकीचा मेल, महापालिकेत एकच खळबळ
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; थेट
गाडी, कॅबिनसह तुला... मुंबईच्या महापौरांना जीवे मारण्याची धमकी; त्या ई-मेलमागील सत्य प्रथमच समोर
पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता
Beed | पुरुषोत्तमपुरीत भीषण दुर्घटना! 50 भाविकांची बोट पलटी, एक बालक बेपत्ता तर...
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान
'विरोधी पक्षात असाल तर थेट कारवाई...' वर्धापन दिनाच्या भाषणादरम्यान NCP नेत्याचं मोठं विधान
Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
मुंबईत मराठींना नो एंट्री?; Only Gujarati & Marwari, व्हायरल जाहिरातीवरून मराठी तरुण संतप्त
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
नाराज छगन भुजबळ घेणार मोठा निर्णय? त्या वक्तव्याची जोरदार चर्चा
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; राऊतांनी केला मोठा गौप्यस्फोट!
ठाकरे गटात फूट पाडण्याचा प्लॅन?; संजय राऊतांनी अमित शाहांचं नाव घेत केला मोठा गौप्यस्फोट! म्हणाले....
लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार?
Sanjay Raut | लंडनमध्ये मंत्री-न्यायाधीश एकत्र? हे आम्हाला काय न्याय देणार? संजय राऊतांचा थेट हल्ला; लंडन दौऱ्यावरून खळबळ!
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब,
विधान परिषदेच्या रणधुमाळीत भयंकर घडलं, कॉंग्रेस उमेदवार रातोरात गायब, नंतर अचानक... काय घडलं?