AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar: कृपा करा, नेहरू आणि मोदींची तुलना मात्र करू नका, शरद पवारांचे मोठे वक्तव्य, कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन

Sharad Pawar on Pandit Nehru And PM Narendra Modi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना सुरू आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.

Sharad Pawar: कृपा करा, नेहरू आणि मोदींची तुलना मात्र करू नका, शरद पवारांचे मोठे वक्तव्य, कुणाच्या डोळ्यात झणझणीत अंजन
शरद पवारImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 10, 2026 | 2:24 PM
Share

Sharad Pawar on Pandit Nehru And PM Narendra Modi: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात येत आहे. त्यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या 27 व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये झाला. तेव्हा पवार यांनी अनेकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. त्यांनी यावेळी काँग्रेस, नेहरू आणि गांधी घराण्याचे देशासाठीच्या योगदानावर प्रकाश टाकला. तर दोन्ही नेत्यांची तुलना होऊ शकत नाही असे स्पष्ट केले.

सत्ता असो वा नसो त्याची चिंता नाही

आज वर्धापन दिनाचा कार्यक्रम. मला मोठी गंमत वाटली. पक्षाची जाहिरात सर्व वर्तमानपत्रात पहिल्या पानावर पाहिली. आजपर्यंत मी टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर जाहिरात पाहिली नव्हती. कारण पहिल्या पानावर जाहिरात द्यायची म्हणजे त्याची किंमत किती असते मला माहित आहे. त्यामुळे मी त्या रस्त्याने कधी गेलो नाही. पण आज जाहिरात पाहिली नाही असे शरद पवार म्हणाले.

तुमची उपस्थितीत पाहिली तर ही जाहिरात सर्वांसाठी आहे. त्याचं स्वागत आपण केलं पाहिजे. आज वर्धापन दिन आहे. सत्ता असो नसो, त्याची चिंता तुम्ही कधी केली नाही. अनेकांनी आयुष्याचा महत्त्वाचा काळ विरोधी पक्षात दिला. आपण सत्ता असली की सत्तेत काम करतो. नसेल तर लोकांमध्ये काम करतो, असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले.

पंतप्रधान पदाची प्रतिष्ठा ठेवा

प्रश्न खूप आहेत. देशाच्या समस्या आहेत. सुशिक्षित बेकार असेल, आदिवासी, महिला, अल्पसंख्या या घटकांच्या समस्यांनी देशात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांना या प्रश्नावर किती आस्था आहे, त्यावर भाष्य न केलेलं बरं. काही लोक काही दिवस सतत एकच गोष्ट सांगायचा प्रयत्न करत आहेत की या देशात असा एखादा नेता झालाच नाही. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. प्रधानमंत्रीपद संस्थात्मक पद आहे. त्या पदाची प्रतिष्ठा ठेवणं हे भारतीयाचं काम आहे. धोरणात्मक गोष्टी आम्ही मांडू. पण धोरणात्मक पदाची प्रतिष्ठा आम्ही ठेवत असतो. त्याचा अनादर करत नाही. पण गंमत वाटते, आज दोन गोष्टी पाहण्यात आल्या. एकावेळेस त्यांनी आजच्या नेतृत्वाची तुलना जवाहरलाल नेहरूंशी केली. ठिक आहे. तुम्ही पंतप्रधान झाला. त्यांना इतकी वर्ष मिळाली. त्याचं महत्त्वं आहे. पण ही स्पर्धा नेहरूंशी होऊ शकते का? ही स्पर्धा नेहरू असताना सांगण्याचा प्रयत्न  आहे की नेहरू जितके दिवस पंतप्रधान होते याच्याशी आहे. मोदीही तितके काळ आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यांना अधिक काळ मिळावा हे त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल तर वावगं नाही, असे शरद पवार म्हणाले.

नेहरूंच्या काळाशी तुलना होऊ शकते का? 

नेहरूंचा काळ, त्यांचं कर्तृत्व आणि योगदानाशी त्यांची तुलना होऊ शकते का? पंतप्रधान होण्या आधी नेहरूंनी इंग्रजांना देशातून बाहेर काढण्याचं काम केलं. मोलाची कामगिरी केली. हा इतिहासाचा भाग आहे. हे विसरू शकत नाही. नेहरू सुविद्य गृहस्थ होते. संघर्ष करणारे होते. स्वातंत्र्या आधी अनेक वर्ष तुरुंगात राहिले. संघर्ष केला. गांधींच्या नेतृत्वाखाली. शेवटी तुम्हाला मला स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून ओळख झाली. यात नेहरूंची कामगिरी मोठी होती. ती विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी सुनावले.

Follow Us
मोठी बातमी! त्रिषावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत...
मोठी बातमी! अभिनेत्री त्रिशावरील वक्तव्य भोवलं; उधयनिधी स्टॉलिन यांच्याबाबत कोर्टाचे तातडीचे निर्देश
सुरज चव्हाणांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
NCP Rada | सुरज चव्हाण यांचा गांधी भवनात राडा; नेमके आदेश दिले कोणी?
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह नेमकं कोणाचं, कोर्टात दोन्ही बाजुने युक्तीवाद अखेर...
बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण...
Devendra Fadnavis | बातमीत येण्यासाठी खालच्या स्तराचं राजकारण; काँग्रेसला मुख्यमंत्री फडणवीसांचं जशास तसं उत्तर
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... शिंदे थेट म्हणाले
जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेवावी, यांची बुद्धी... सुनेत्रा पवारांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी सुनावलं
विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर...
Sada Sarvankar | विरोधक धर्माचं राजकारण करतायत!; सिद्धिविनायक दानचोरी प्रकरणावर सदा सरवणकरांचा स्फोटक दावा
दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला,
Amit Shah | दिल्लीत भेटींचे सत्र सुरूच! पुन्हा NCP नेता अमित शाहांच्या भेटीला, काय घडलं?
काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
Congress | काँग्रेस कार्यालयात घुसलेल्या NCP कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
NCP Vs Congress | गुंगी गुडिया पोस्टवरून काँग्रेसला घेरलं; काँग्रेस कार्यालयात राष्ट्रवादीची थेट घुसखोरी; आधी माफी मागा म्हणत...
विमान हवेत असतानाच छताला तडा...प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या...
विमान हवेत असतानाच छताला तडा... प्रवाशांचा जीव मुठीत; एअर इंडियाच्या विमानाची पुन्हा भयानक दुर्घटना