खड्ड्यानं घेतला बाळ-बाळंतीणीचा जीव! यवतमाळच्या उमरखेडमधील दुर्दैवी घटना, वेळीच उपचार मिळाले असते तर..?

गर्भवती महिला मन्याळी गावात बाळंतपणासाठी आली होती. या महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्या होत्या.

खड्ड्यानं घेतला बाळ-बाळंतीणीचा जीव! यवतमाळच्या उमरखेडमधील दुर्दैवी घटना, वेळीच उपचार मिळाले असते तर..?
Breaking News
| Edited By: | Updated on: Apr 12, 2022 | 12:25 AM

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात दुर्दैवी घटना घडली आहे. एका गर्भवती महिलेचा खड्ड्यामुळे जीव गेला आहे. तसंच या महिलेच्या गर्भात वाढणारं बाळही या दुर्दैवी घटनेत दगावलं आहे. या घटनेनं एकच संताप व्यक्त केला जातो आहे. यवमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात ही घटना घडली आहे. गर्भवती महिला मन्याळी गावात बाळंतपणासाठी आली होती. या महिलेला प्रसुतीकळा सुरु झाल्या होत्या. प्रसुतीकळा सुरु झाल्यानंतर या महिलेला रिक्षातूनच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात येत होतं. मात्र रिक्षातून नेतेवेळी ही रिक्षा रस्त्यातील खड्ड्यात आदळली. दरम्यान गर्भवती महिलेची ऑटोरिक्षामध्येच प्रसुती झाली. मात्र यानंतर वेळेत रुग्णालय गाठता न आल्यामुळे बाळ आणि बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये नताशा ढोके या 30 वर्षीय महिलेनं जीव गमावला आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.