Yavatmal Crime | यवतमाळच्या पाटीपुऱ्यात गँगवार, कारागृहातून पॅरोलवर आलेल्या युवकाची हत्या, दोघे जण गंभीर जखमी

आरोपी हा कारागृहातून पॅरोलवर आला होता. दारू पित असताना वाद झाला. हा वाद सोडविण्याच्या भानगडीत दोन गटांत वाद झाला. या वादातून तीन जणांवर हल्ला करण्यात आला. यात एकाचा खून झाला.

Yavatmal Crime | यवतमाळच्या पाटीपुऱ्यात गँगवार, कारागृहातून पॅरोलवर आलेल्या युवकाची हत्या, दोघे जण गंभीर जखमी
यवतमाळातील जखमीला रुग्णालयात भरती करण्यात आले. Image Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 11:53 AM

यवतमाळ : जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना कोविड काळात अमरावती येथील कारागृहातून (Jail at Amravati) पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीचा खून करण्यात आला. दोन जणांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना यवतमाळच्या पाटीपुरा येथील जयभीम चौकात (Patipura Jaybhim Chowk) घडली. पाटीपुरा जयभीम चौकात 7 ते 8 जण मद्य घेत होते. यावेळी दोन जणांमध्ये वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी दोन्ही गट समोरासमोर आले. यावेळी शाब्दिक बाचाबाची झाली. 9 जणांच्या टोळक्याने 3 जणांवर खुनासह प्राणघातक हल्ला केला. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला व पॅरोलवर बाहेर आलेला वैभव नाईक (Vaibhav Naik) याचा खून करण्यात आला. सुहास अनिल खैरकार (वय 26, रा. अशोकनगर), नयन नरेश सौदागर (वय 22, विठ्ठलवाडी, यवतमाळ) हे दोघे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत.

आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना

याबाबत यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात आदेश अनिल खैरकार (वय 24, रा. अशोकनगर) याने तक्रार दिली. यात शुभम वासनिक, बंटी पटाळे, करण तिहीले, अर्जुन तिहीले, रोशन उर्फ डीजे नाईक, प्रथम रोकडे, अभी कसारे व इतर 3 जण अश्या 10 जणांविरुद्ध खून व हल्ला प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या खून व हल्ला प्रकरणातील आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहेत.

अशी घडली घटना

आरोपी हा कारागृहातून पॅरोलवर आला होता. दारू पित असताना वाद झाला. हा वाद सोडविण्याच्या भानगडीत दोन गटांत वाद झाला. या वादातून तीन जणांवर हल्ला करण्यात आला. यात एकाचा खून झाला. तर दुसरे दोघे गंभीर जखमी झालेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवसांपासून शांत असलेल्या गॅंगवारने पुन्हा डोके वर काढल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.