यवतमाळ : जिल्ह्याच्या उमरखेड (Umarkhed) येथील एका प्राध्यापकांचा मृतदेह दिग्रस जवळच्या सिंगद येथे आढळला. या घटनेबाबत अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. शेवटी मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचे पुढे आले. त्यावरून आता पोलिसांनी तपास करून मृतकाची पत्नी तिच्या प्रियकराला अटक केली. सचिन वसंत देशमुख हा उमरखेड येथील कृषी महाविद्यालयात (College of Agriculture) प्राध्यापक होता. तर त्याची पत्नी धनश्री ही अकोट इथ वन विभागात नोकरीला आहे. त्यामुळे सचिन हा पत्नीला भेटण्यासाठी अकोटला गेला. मात्र 5 दिवसांनंतर तो घरी परतला नाही. त्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांना दिग्रसजवळ (Digras Police) क्या सिंगद येथील पुलाखाली सचिन देशमुख याचा मृतदेह आढळला. या घटनेनंतर चांगलीच खळबळ उडाली.