AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yeola Vidhan Sabha: येवल्याची निवडणूक ठरणार प्रतिष्ठेची; छगन भुजबळांना आरक्षण, कांदा प्रश्न रडवणार?

महाराष्ट्रातील नाशिकमधील येवला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही यंदा प्रतिष्ठेची ठरणार आहे. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून छगन भुजबळ यांचं वर्चस्व असलं तरी यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यासमोर अनेक आव्हानं आहेत. त्यांच्यासाठीही ही निवडणूक सोपी ठरणार नाही, हे नक्की!

Yeola Vidhan Sabha: येवल्याची निवडणूक ठरणार प्रतिष्ठेची; छगन भुजबळांना आरक्षण, कांदा प्रश्न रडवणार?
महाविकास आघाडीने जोरात दंड थोपटले तर भुजबळांचा बसणार पराभवाचा फटका? Image Credit source: Tv9
| Updated on: Oct 11, 2024 | 12:09 PM
Share

नाशिक जिल्ह्यातील येवला विधानसभा मतदारसंघ हा दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. येवला म्हटलं की पैठणी साडी डोळ्यांसमोर येते. पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या मतदारसंघात माळी, विणकरी, मराठी, वंजारी या समाजाचंही प्राबल्य दिसून येतं. कांद्याची मोठी बाजारपेठ असलेलं लासलगाव, पाटोदा आणि येवला ही महत्त्वाची शहरं या मतदारसंघात येतात. 2008 मध्ये केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार येवला मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील येवला, निफाड तालुक्यातील लासलगाव आणि देवगाव या महसूल मंडळांचा समावेश होतो. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा राजकारणातील प्रवास जरी मुंबईतून सुरू झाला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते येवला मतदारसंघात राजकीयदृष्ट्या स्थिर झाले. या मतदारसंघावर छगन भुजबळ यांचं वर्चस्व राहिलं आहे. एकेकाळी येवला हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. नंतर तिथे शिवसेनेचंही वर्चस्व प्रस्थापित झालं होतं. मात्र 2004 मध्ये छगन भुजबळ यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आल्यानंतर येवला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण झाली. आता भुजबळांकडे मंत्रीपद, निधी, अजित दादा आणि घड्याळ्याचं चिन्हसुद्धा आहे, तरीही येवला मतदारसंघ त्यांच्यासाठी विविध कारणांमुळे आव्हानात्मक ठरणार...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...