AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ही तर फक्त सुरुवात…’, बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर योगेश कदमांचं मोठं भाकीत

शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे, यावर प्रतिक्रिया देताना योगेश कदम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

'ही तर फक्त सुरुवात...', बडगुजरांच्या हकालपट्टीनंतर योगेश कदमांचं मोठं भाकीत
| Updated on: Jun 04, 2025 | 7:09 PM
Share

आज शिवसेना ठाकरे गटातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सुधाकर बडगुजर यांनी दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे  शिवसेना ठाकरे गटाचे  नेते आणि खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असतानाच ही भेट झाली होती, या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं होतं. त्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली, आज पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

सुधाकर बडगुजर हे भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. मात्र त्यांच्या भाजप प्रवेशाला आमदार सीमा हिरे यांनी विरोध केला आहे, सीमा हिरे यांनी त्यांच्याविरोधात दोनदा निवडणूक लढवली आहे. सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. बडगुजर यांच्यावर 17 गुन्हे दाखल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. बडगुजर यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला सीमा हिरे यांनी विरोध केल्यामुळे आता बडगुजर यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अनेक शिवसैनिक उद्धव ठाकरे यांना सोडून आमच्या पक्षात सहभागी झाले. शिवसैनिकांना न्याय द्यायचं काम एकनाथ शिंदे करतात, हा ओढा भविष्यात वाढणार आहे, चांगले कार्यकर्ते शिवसेने सोबत जोडले जात आहेत त्यांचं स्वागत. भविष्य त्यांना चांगली संधी उपलब्ध करून देऊ. त्यांच्या माध्यमातून शिवसेना मजबूत होईल. सगळ्याच लोकांची हकालपट्टी त्यांना करावी लागणार आहे.  त्यांच्यासोबत कोणी थांबायला तयार नाही. त्यांची नेहमीच कार्यकर्त्याांना दाबण्याची रणनीती आहे, त्यामुळे त्यांना सगळेच सोडून जात आहेत, असं कदम यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महायुतीमध्ये कोणीही नाराज नसून,  तिन्ही नेते मिळून राज्याचा गाडा व्यवस्थित हाकत आहेत, असंही यावेळी कदम यांनी म्हटलं आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!